हे काय? तीन हात, तीन पायांचं बाळ! बिहारमध्ये विचित्र स्थिती, सोनोग्राफीलाही चकवा!

बिहारमध्ये तीन हात आणि तीन पाय असलेले बाळ जन्माला आले आहे. मातेच्या नॉर्मल डिलिव्हरीनंतर अशा स्थितीत बाळाचा जन्म झाल्यानंतर डॉक्टरही चक्रावून गेले आहेत.

हे काय? तीन हात, तीन पायांचं बाळ! बिहारमध्ये विचित्र स्थिती, सोनोग्राफीलाही चकवा!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 2:38 PM

बिहारमध्ये एका विचित्र स्थितीत बाळाचा जन्म झाला आहे. या नवजात बालकाला तीन हात आणि तीन पाय आहेत. बिहारमधील वैकुंठपूर येथील रेवतिथ येथील रहिवासी मोहम्मद रहीम अली यांच्या पत्नीची नुकतीच डिलिव्हरी झाली. त्यानंतर जन्मलेल्या बाळाला तीन हात आणि तीन पाय असल्याचे आढळले. या प्रकारामुळे डॉक्टरही चक्रावून गेले.

वैकुंठपूर येथील आरोग्य केंद्रात प्रसूती

वैकुंठपूर येथील रेवतिथ निवासी मोहम्मद रहीम अली यांच्या 30 वर्षीय पत्नी रबीना खातून यांना प्रसूती वेदना सुरु झाला. कुटुंबियांनी त्यांना वैकुंठपूर येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात भरती केले. त्यानंतर रबीना यांची नॉर्मल डिलिव्हरी झाली, मात्र जन्मलेल्या बाळाची स्थिती काही विचित्र दिसून आली. या बाळाला तीन हात आणि तीन पाय होते.

डॉक्टर काय म्हणतात?

सार्वजनिक आरोग्य केंद्रातील सर्जन आफताब आलम म्हणाले, एका विशिष्ट सिंड्रोममुळे या नवजात बालकाचा अॅबनॉर्मल जन्म झाला आहे. लाखात एक असे बाळ जन्मते. विशेष म्हणजे मातेची गर्भधारणेदरम्यान सोनोग्राफीदेखील करण्यात आली होती. मात्र डॉक्टरांना त्यात ही गोष्ट दिसून आली नाही.

बाळाची अवस्था नाजूक

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या बाळाला जन्माच्या दोन तासानंतरही मातेचे दूध पाजता आले नाही. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली. बाळाला दुसऱ्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. बाळाची प्रकृती नाजूक असली तरीही फार धोका नाही, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

इतर बातम्या-

Sindhudurg District Bank Election Result : ‘पोलिसी दडपशाही, सत्तेची अरेरावी झुगारून लोकशाही निवडली’

Mazhi Tuzhi Reshimgaath | यशची खरी ओळख येणार नेहाच्या समोर! काय असेल तिची प्रतिक्रिया?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.