…म्हणून भाजपला इंधानाचे दर कमी करावे लागले- पी चिदंबरम
लालू प्रसाद यादव (Lalu Yadav) यांनी, "मोदी सरकारने पेट्रोलचे दर 5 रुपयांनी कमी करण्याचे नाटक केले आहे. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीनंतर (UP Elections) पेट्रोलियमच्या किमती पुन्हा वाढवल्या जातील", असा आरोप त्यांनी केला.
नवी दिल्लीः केंद्राने बुधवारी घोषणा केली की 4 नोव्हेंबरपासून पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलसाठी 10 रुपयांनी उत्पादन शुल्क कमी होईल. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असं केंद्र सरकारने सांगितलं. मात्र विरोधक भाजप सरकारवरने हा निर्णय फक्त आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर घेतला आहे, अशी टीका करतायेत. (BJP decreased petrol diesel prices because of elections loss said P Chidambaram Congress)
काँग्रेस खासदार पी चिदंबरम म्हणाले की, ‘नुकत्याच झालेल्या तीन लोकसभा आणि 30 विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या खराब कामगिरीनंतर हा निर्णय घेण्यात आला. इंधनावरील उच्च कर हा केंद्र सरकारचा लोभ आहे,’ असे त्यांनी लिहिले. तर काँग्रेस आणि भाजप पक्षांमधील मतांची तफावतही त्यांनी निदर्शनास आणून दिली.
The results of the 30 Assembly and 3 LS by-elections have produced a by-product
The centre has cut excise duties on petrol and diesel!
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) November 4, 2021
Here is another interesting analysis of the results of the by-elections
In states where the Congress won, it did so with a significantly higher vote share:
– In HP, the Congress vs BJP was 48.9% to 28%
– In Maharashtra, it was 57% to 35%
– In Rajasthan, it was 37.51% to 18.8%
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) November 3, 2021
In states where the Congress lost to the BJP, the spread was narrow:
– in MP: Congress’ vote share was 45.45% and BJP’s was 47.58%
– In Karnataka, where the two parties won one seat each, the vote share was Congress 44.76% and BJP 51.86%
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) November 3, 2021
“उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर दर पुन्हा वाढवणार”
तर दुसरीकडे, राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) नेते लालू प्रसाद यादव यांनी, “मोदी सरकारने पेट्रोलचे दर 5 रुपयांनी कमी करण्याचे नाटक केले आहे. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोलियमच्या किमती पुन्हा वाढवल्या जातील”, असा आरोप त्यांनी केला. “केंद्राने जाहीर केलेल्या पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्याने लोकांना खरा दिलासा मिळणार नाही. पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात केलेली कपात अपुरी आहे. जर किमती 50 रुपये प्रति लिटरने कमी केल्या तर दिलासा मिळाला असता”, असं लालू प्रसाद म्हणाले.
आरजेडीचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले की, पेट्रोलचे दर 70 रुपयांच्या खाली आणले पाहिजेत. ते म्हणाले, “आधी, भाजपला पेट्रोल प्रति लिटर 70 रुपये महाग देत होते आणि आता त्यांनी 100 रुपयांच्या वर भाव वाढवले आहेत. त्यांनी पेट्रोलचे दर किमान 70 रुपयांच्या खाली आणले पाहिजेत,” असे ते म्हणाले.
योगींने पंतप्रधानांचे मानले आभार
दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आणि ही दिवाळीची भेट असल्याचे म्हटले. “डिझेल आणि पेट्रोलवरील उत्पादन शुल्क कमी करण्यात आल्याबद्दल आम्ही पंतप्रधानांचे आभारी आहोत. जेव्हा लोकांच्या जीवनात महागाई येते तेव्हा डिझेल आणि पेट्रोलचा त्यात हातभार लागतो. हा मोठा दिलासा आहे. या निमित्ताने पंतप्रधानांची ही दिवाळीची भेट आहे,” आदित्यनाथ यांनी आज पत्रकारांना सांगितले.
Related News