AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांना लुटलं तर सरकारपुढं हातपाय जोडणार नाही, थेट कोर्टात जाणार, भाजप खासदार वरुण गांधींचा योगी सरकारलाच इशारा

वरुण गांधींनी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते म्हणत आहे की, जर शेतकऱ्यांच्या बाबतीत भ्रष्टाचार झाला तर सरकारसमोर झुकणार नाही, तर थेट कोर्टात जाणार.

शेतकऱ्यांना लुटलं तर सरकारपुढं हातपाय जोडणार नाही, थेट कोर्टात जाणार, भाजप खासदार वरुण गांधींचा योगी सरकारलाच इशारा
भाजप खासदार वरुण गांधी
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 5:36 PM

भाजप खासदार वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला असून आपल्या मतदारसंघातील पीक खरेदीत कोणत्याही प्रकारची अनियमितता चालणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कृषी कायदा आणि यूपी सरकारवर सातत्याने होणाऱ्या टीकेमुळे त्यांना पक्षाच्या नाराजीला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळेच त्यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते म्हणत आहे की, जर शेतकऱ्यांच्या बाबतीत भ्रष्टाचार झाला तर सरकारसमोर झुकणार नाही, तर थेट कोर्टात जाणार. (Bjp Leader and mp Varun Gandhi raised farmers issue target Yogi aadityanath government BJP )

हा व्हिडिओ शेअर करताना वरुण गांधी यांनी लिहिले की, “जोपर्यंत MSPची हमी मिळत नाही तोपर्यंत बाजार समित्यात शेतकऱ्यांचे शोषण होतच राहील. त्यावर कठोर कारवाई व्हायला हवी.”

पाहा व्हिडीओ:

बाजार समितीतील मध्यस्थांना इशारा

याच व्हिडिओमध्ये वरुण गांधी एका मार्केटमध्ये कर्मचाऱ्यांना अटक करण्याचा इशारा देताना दिसत आहेत. मध्यस्थांचा उल्लेख करून ते म्हणाले, “तुम्ही प्रत्येक गोष्टीत खोटं कारण शोधता. ओलं आहे, खराब आहे, काळं पडलं आहे असं सांगून तुम्ही शेतमाल नाकारता. आणि तेच कमी किंमतीत घेऊन तुम्ही इतरांना जास्त किंमतीत विकता.

ते म्हणाले, “”आतापासून माझा एक प्रतिनिधी राहील आणि प्रत्येक मोठ्या खरेदी केंद्रावर लक्ष ठेवेल. तुम्ही लोकांनी भ्रष्टाचार केला असेल किंवा शेतकर्‍यांवर अन्याय केला असेल तर मी सरकारसमोर हातपाय जोडणार नाही, मी थेट कोर्टात जाऊन तुम्हा सर्वांना अटकेत टाकेन.

याआधीही वरुण गांधी यांनी लखीमपूर जिल्ह्यातील बाजारपेठेत शेतकऱ्यांचे पीक जाळल्याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला होता. शनिवारी वरुण गांधी यांनी एका शेतकऱ्याचा व्हिडिओ ट्विट केला आणि लिहिले, “उत्तर प्रदेशातील शेतकरी श्री समोध सिंह गेल्या 15 दिवसांपासून आपल्या धानाचं पिक विकण्यासाठी मंडईत चकरा मारत होते, धान विकले गेले नाही तेव्हा निराश झाले. त्यांनी तिथेच त्या पिकाला आग लावली. या व्यवस्थेने शेतकऱ्यांना कुठे उभे केले आहे? कृषी धोरणाचा पुनर्विचार करणे ही काळाची गरज आहे. यापूर्वीही वरुण गांधी तीन कृषी कायद्यांबाबत बोलले होते.

हेही वाचा:

जम्मू काश्मीरमधील सार्वजनिक इमारतींना आता शहिदांची नावं दिली जाणार, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत सरकारचं मोठं पाऊल

“भारताचं स्वातंत्र्य ब्रिटीशांकडून 99 वर्षांच्या करारावर” म्हणणारी भाजयुमोची प्रवक्ता सोशल मीडियावर ट्रोल

 

पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक, अधिकारी मारले; लेफ्टनंट जनरल घईंची माहिती
पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक, अधिकारी मारले; लेफ्टनंट जनरल घईंची माहिती.
पाकिस्तानी ऑफिशियल भिखमंगे; ओवेसींनी पुन्हा पाकिस्तानची लक्तरं काढली
पाकिस्तानी ऑफिशियल भिखमंगे; ओवेसींनी पुन्हा पाकिस्तानची लक्तरं काढली.
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.