AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप नेता दिलीप घोष वयाच्या 60 वर्षी घेणार सात फेरे, होणारी वधू पक्षात कार्यकर्ता

दिलीप घोष भाजप प्रदेशाध्यक्ष असताना एका कार्यक्रमात त्यांची रिंकी मजूमदार यांच्याशी ओळख झाली होती. त्यावेळी दिलीप घोष यांच्या आग्रहानंतर रिंकी मजूमदार भाजपमध्ये दाखल झाले. 2021 मध्ये रिंकी मजूमदार आणि दिलीप घोष यांच्यात मैत्री झाली होती.

भाजप नेता दिलीप घोष वयाच्या 60 वर्षी घेणार सात फेरे, होणारी वधू पक्षात कार्यकर्ता
दिलीप घोष अन रिंकी मजूमदार
| Updated on: Apr 18, 2025 | 10:01 AM
Share

पश्चिम बंगालमधील भाजप नेता आणि माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष वयाच्या 60 वर्षी लग्न बंधनात अडकरणार आहेत. दिलीप घोष 19 वर्षाचे असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सहभागी झाले होते. आता 41 वर्षानंतर आईच्या आग्रहामुळे ते लग्न करणार आहेत. दिलीप घोष यांची होणारी पत्नी रिंकी मजूमदार भाजप कार्यकर्ता आहे. त्यांनी महिला मोर्चाची जबाबदारी सांभाळली आहे.

दिलीप घोष आणि रिंकी मजूमदार यांचे लग्न शुक्रवारी अगदी साध्या पद्धतीने होणार आहे. या लग्नात फक्त जवळचे नातेवाईक सहभागी होणार आहेत. रिंकी मजूमदार या 50 वर्षांच्या आहेत. त्यांचा घटस्फोट झाला आहे. त्यांना एक 25 वर्षांचा मुलगा असून तो आयटी उद्योगात नोकरीला आहे.

अशी झाली होती भेट

दिलीप घोष भाजप प्रदेशाध्यक्ष असताना एका कार्यक्रमात त्यांची रिंकी मजूमदार यांच्याशी ओळख झाली होती. त्यावेळी दिलीप घोष यांच्या आग्रहानंतर रिंकी मजूमदार भाजपमध्ये दाखल झाले. 2021 मध्ये रिंकी मजूमदार आणि दिलीप घोष यांच्यात मैत्री झाली होती. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिलीप घोष यांचा पराभव झाला. त्यानंतर ते नैराश्यात आले. त्यावेळी रिंकी मजूमदार यांनी दिलीप घोष यांना सावरले. त्यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. दिलीप घोष यांनी त्यावेळी लग्न करण्यास नकार दिला. परंतु त्यानंतर आईच्या आग्रहामुळे त्यांनी लग्न केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता असल्यामुळे दिलीप घोष यांनी लग्नाबाबत कधीच विचार केला नाही. दिलीप घोष यांना लग्नासाठी तयार करण्यासाठी रिंकी मजूमदार यांना खूप प्रयत्न करावे लागले. त्यांनी स्वत: दिलीप घोष यांच्या आईला लग्नासंदर्भात सांगितले. त्यानंतर दिलीप घोष यांच्या आईने त्यांना लग्नासाठी तयार केले. दिलीप घोष यांनाही जीवनात कोणाची तरी साथ हवी, असे हळूहळू वाटू लागले. 3 एप्रिल रोजी ईडन गार्डन स्टेडियममध्ये आयपीएल सामन्यादरम्यान दिलीप घोष, रिंकी मजूमदार आणि रिंकी यांचा 25 वर्षीय मुलगा सोबत दिसला. दिलीप घोष यांच्या लग्नाच्या बातमीनंतर भाजपमध्ये दोन मतप्रवाह समोर आले आहे. काही लोकांनी त्यांना या वयात लग्न न करण्याचा सल्ला दिला.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.