BJP Attack on Kejriwal: दिल्लीत केजरीवालांच्या घरावर नेमका हल्ला कसा झाला? CCTV फुटेजनं भाजप युवा मोर्चाला उघडलं पाडलं, पाहा व्हिडीओ

आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. भाजपच्या गुंडांनीच हा हल्ला केल्याचा दावा आपचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केला आहे.

BJP Attack on Kejriwal: दिल्लीत केजरीवालांच्या घरावर नेमका हल्ला कसा झाला? CCTV फुटेजनं भाजप युवा मोर्चाला उघडलं पाडलं, पाहा व्हिडीओ
दिल्लीत केजरीवालांच्या घरावर नेमका हल्ला कसा झाला? CCTV फुटेजनं भाजप युवा मोर्चाला उघडलं पाडलंImage Credit source: ani
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 5:28 PM

नवी दिल्ली: आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. भाजपच्या (BJP) गुंडांनीच हा हल्ला केल्याचा दावा आपचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी केला आहे. भाजपने हा आरोप नाकारलेला नाही. मात्र, आता या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्याने भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनीच हा हल्ला केल्याचं उघड झालं आहे. भाजपचे 20 ते 25 कार्यकर्ते केजरीवाल यांच्या घराच्या गेटवर आल्याचं दिसून येत आहेत. काही कार्यकर्त्यांच्या कपाळाला भगवी पट्टी बांधलेली दिसत आहेत. सर्व कार्यकर्ते तरुण असून हे कार्यकर्ते केजरीवाल यांच्या घराचा गेट उघडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. घराचा भला मोठा गेट जोरजोरात हलवतानाही दिसत आहे. या फुटेजमुळे भाजप युवा मोर्चाची चांगलीच कोंडी झाली असून या सर्व हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय?

एएनआय या वृत्त संस्थेने हा सीसीटीव्ही फुटेज ट्विट केला आहे. 41 सेकंदाचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे. केजरीवाल यांच्या घराच्या गेटसमोरचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे. या फुटेजमध्ये केजरीवाल यांच्या घराबाहेर कोणतीच रहदारी दिसत नाही. 8 सेकंदानंतर एक तरुण केजरीवाल यांच्या घराच्या परिसरात येऊन तिथल्या बॅरिकेड्सला लाथ मारताना दिसत आहे. हा आवाज ऐकून सेक्युरिटी गार्ड त्याच्या केबिनबाहेर पडतो. त्यानंतर आणखी काही तरुण जमा होतात. हा सुरक्षा रक्षक या तरुणांच्या दिशेने जाऊन त्यांना आत येण्यास मज्जाव करताना दिसत आहे. मात्र, हा सुरक्षा रक्षक एकटा आणि तरुणांचा मोठा जत्था त्यामुळे सुरक्षा रक्षकाला धक्का मारून हे सुरक्षा रक्षक गेटपर्यंत येण्यास यशस्वी ठरतात. त्यानंतर काही तरुण गेटला जोरजोरात धक्का मारतात. गेट काही उघडत नाही. त्यामुळे हे सर्व तरुण पुन्हा निघून जात असल्याचं या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं. तर सुरक्षा रक्षक फोनवरून कुणाशी तरी बोलतानाही दिसत आहे. त्यामुळे हा हल्ला आपच्या कार्यकर्त्यांनीच केल्याचं स्पष्ट होत आहे.

आपचा दावा काय?

मनिष सिसोदिया यांनी ट्विट करून या हल्ल्याचं संपूर्ण खापर भाजपवर फोडलं आहे. भाजपच्या गुंडांनी केजरीवाल यांच्या घराची तोडफोड केली आहे. भाजपच्या पोलिसांनी या गुंडांना रोखण्याऐवजी केजरीवालांच्या घरापर्यंत त्यांना घेऊन गेली, असा आरोपही सिसोदिया यांनी केला आहे. भाजप युवा मोर्चाची निदर्शने सुरू होती. त्यावेळी आंदोलकांनी गोंधळ घातला. सीसीटीव्हीवरही हल्ला केला. मुख्यमंत्र्यांच्या घराच्या बाहेर रंग फेकला. या प्रकरणी आम्ही 50 लोकांना ताब्यात घेतलं आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या निवासाबाहेर जमलेला जमाव पांगवण्यात आला असून आता या परिसरात शांतता असल्याचं दिल्ली नॉर्थ डीसीपींनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

attacked on kejriwal house: अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला, सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले

Nanar Refinery Project : विदर्भात नाणार प्रकल्प नेण्यासाठी काँग्रेस नेता मला भेटला: संजय राऊत

अरविंद केजरीवाल यांच्यावर केलेले वक्तव्य भाजपला भोवले; दिल्ली विधानसभेतून 3 आमदार निलंबित

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.