ज्या त्रिपुरातल्या घटनांवर महाराष्ट्रात दंगली उसळल्या तिथं नेमकं कोण जिंकलंय? भाजपा की ममता बॅनर्जी?
त्रिपुरात (Tripura) झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल (Local body elections) आज लागला. यात निवडणुकीत भाजपनं आपला झेंडा फडकवल्याचं पाहायला मिळत आहे. त्रिपुरात 14 नगर पालिकांच्या निवडणुकीचे निकाल येत आहेत. त्यात भाजप अन्य राजकीय पक्षांना क्लीन बोल्ड करताना दिसतेय.
मुंबई : त्रिपुरातील कथित घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओंमुळे महाराष्ट्रातील अमरावती, नांदेड आणि मालेगाव या शहरात दंगली उसळल्या होत्या. त्याच त्रिपुरात (Tripura) झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल (Local body elections) आज लागला. यात निवडणुकीत भाजपनं आपला झेंडा फडकवल्याचं पाहायला मिळत आहे. त्रिपुरात 14 नगर पालिकांच्या निवडणुकीचे निकाल येत आहेत. त्यात भाजप अन्य राजकीय पक्षांना क्लीन बोल्ड करताना दिसतेय. भाजपने 8 जागी विजय मिळवला आहे. तर अन्य जागांची मतमोजणी (Counting) अद्यापही सुरु आहे. 20 पैकी 14 नगर पंचायतींसाठी गुरुवारी मतदान झालं होतं. भाजपने सर्व जागांवर आपले उमेदवार उतरवले होते. एकूण 334 जागांपैकी 112 जागांवर तर भाजप उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अन्य नगर पालिका आणि नगर पंचायतींमधील एकूण 222 जागांसाठी मतदान पार पडलं होतं.
त्रिपुरा निवडणूक आयोगाने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, भाजप अंबासा, जिरानिया, तेलियामुरा आणि सबरुममध्ये आघाडीवर आहे. त्रिपुरात 2018 मध्ये सत्तेत आल्यानंतर भाजप या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढत आहे. सुरुवातीच्या कलानुसार अगरताळा नगर पालिकेली सर्व वॉर्डात तृणमूल काँग्रेसचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भाजपला दुपारी 12 वाजेपर्यंत एएमसी क्षेत्रात 58 हजार 821 मत मिळाले होते. तर टीएमसीला 22 हजार 295 मतं मिळाली होती. तर माकप 15 हजार 960 मतांसही तिसऱ्या स्थानावर होती.
भाजपनं सीपीआय(एम)लाही पछाडलं
सापीआय, फॉरवर्ड ब्लॉक आणि आरएसपीने सीपीआय(एम)सोबत आघाडी केली होती. त्यांना एकूण 2 हजार 650 मत मिळाले आहेत. अगरताळा व्यतिरिक्त दोन नगर पंचायतींमध्ये टीएमसीने दुसरं स्थान पटकावलं आहे. तर तीन शहरांमध्ये टीएमसी तिसऱ्या स्थानावर आहे. काँग्रेस एकूण 6 शहरांमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. या 222 जागांवर एकूण 758 उमेदवारांनी निवडणूक लढवली. तर 36 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता.
भाजपचा जल्लोष सुरु
सुरुवातीच्या निकालानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केलीय. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मतमोजणी अजून सुरु आहे आणि संपूर्ण निकाल येण्यास अजून वेळ लागेल असं सांगण्यात आलं आहे. तसंच कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मतमोजणी केंद्रांवर सशस्त्र पोलीस बल, त्रिपुरा पोलीस आणि त्रिपुरा राज्य रायफल्सचे जवान तैनात करण्यात आल्या आहेत.
इतर बातम्या :