भाजपाचा 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठीचा फॉर्म्युला ठरला, 25 टक्क्यांहून जास्त 81 खासदारांची तिकिटे कापणार, कोण असतील हे खासदार?, वाचा

या बैठकीत प्रत्येक खासदाराची निवडणुकीची जबबदारी या बैठकीत निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच तिकिट वाटप कुणाला करायचे याचेही काही नियम या बैठकीत ठरवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपाचा 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठीचा फॉर्म्युला ठरला, 25 टक्क्यांहून जास्त 81 खासदारांची तिकिटे कापणार, कोण असतील हे खासदार?, वाचा
BJP 2024 election preparationImage Credit source: social media
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 5:40 PM

नवी दिल्ली एकीकडे नरेंद्र मोदी सरकार (Narendra Modi Government)आठवी वर्षपूर्ती साजरी करत असतानाच, भाजपाने (BJP)लोकसभा निवडणूक २०२४ (Loksabha Election 2024)ची तयारी सुरु केली आहे. तिसऱ्यांदा पुन्हा एकदा भाजपाचे सरकार आणण्यासाठीची रणनीती ठरवण्याचे काम भाजपाने सुरु केल्याची माहिती आहे. बुधवारी रात्री भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या घरी काही मोजक्या केंद्रीय मंत्र्यांची, पक्षाचील प्रभारी व्यक्तींची आणि खासदारांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. या बैठकीत प्रत्येक खासदाराची निवडणुकीची जबबदारी या बैठकीत निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच तिकिट वाटप कुणाला करायचे याचेही काही नियम या बैठकीत ठरवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

७० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना तिकीट नाही

सध्या लोकसभेत असलेल्या ज्या खासदारांचा जन्म १९५५ सालानंतर झाला आहे, त्यांनाच लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत तिकीट दिले जाईल, अथवा त्यांच्याच नावाचा प्राथमिक विचार करण्यात येईल, असे पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर ठरले असल्याची माहिती आहे. १९५५ पूर्वी जन्मलेल्या खासदारांना तिकिट देण्यात येणार नाही. किंवा तिकिट वाटपात त्यांच्या नावांचा विचारच होणार नाही, अशी भूमिका ठरली आहे. थोडक्यात ज्यांचे वय सत्तरीच्या वर असेल अशा नेत्यांच्या नावांचा तिकिटांसाठी विचार होणार नाही. अगदी अपवादात्मक स्थितीतच एकादोघांसाठी हा नियम शिथिल करण्यात येईल.

८१ खासदारांची तिकिटे आत्ताच कापली

हा नियम जर सध्याच्या ३०१ खासदारांना लागू झाला तर त्यातील ८१ जणांची तिकिटे याच क्षणी कापली गेली आहेत, असाच याचा अर्थ आहे. नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळण्यासाठी जुन्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी त्यांचा मार्ग प्रशस्त करावा, अशी पक्षाची इच्छा आहे. याला तिकिट कापणे असे म्हणण्यापेक्षा, आपली मशाल नव्या पिढीकडे देण्यासारखे आहे, असा याचा अर्थ घ्यायला हवा, असे मत एका वरिष्ठ नेत्याने व्यक्त केले आहे.

हे सुद्धा वाचा

२०२४ च्या निवडणुकीपर्यंत भाजपातील २५ टक्के खासदार सत्तरीपार

सतराव्या लोकसभेत असेलल्या भाजपाच्या ३०१ खासदारांपैकी सुमारे २५ टक्के खासदार हे २०२४ साली सत्तरीपार असणार आहेत. १९५६ च्या पूर्वी जन्मलेल्या खासदारांचा विचार केला तर त्यात उ. प्रदेशातील सर्वात जास्त १२, गुजरातमधील १०, कर्नाटकातील ९, महाराष्ट्रातील ५, झारखंडमधील २, बिहारमधील ६, मध्य प्रदेशातील ५ आणि राजस्थानातील ५ खासदारांचा समावेश आहे.

खासदारआमदारांना बूथची जबाबदारी

२०२४ च्या निवडणुकीत प्रत्येक खासदाराकडे कमकुवत असलेल्या १०० तर आमदाराकडे कमकुवत असलेल्य २५ बूथची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. देसभरात अशा ७४ हजार कमकुवत बूथची यादी तयार करण्यात आलेली आहे. हे बूथ, कार्यकर्ते आणि मतदार मजबूत करावेत, ही जबाबदारी खासदार आणि आमदारांवर असणार आहे. याकामात संघाचीही मदत घेतली जाणार आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.