Boycott Maldives : मालदीव वादात इस्रायलची उडी, भारताला पाठिंबा देत मोठी घोषणा
Israel support India : भारत आणि मालदीव यांच्यातील वादात आता इस्रायलने उडी घेतली आहे. भारताच्या बाजुने नेहमी उभा राहणाऱ्या इस्रायलने पुन्हा एकदा आपली मैत्री दाखवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्विपला पर्यटन स्थळ बनवण्याच्या मागणीला इस्रायलने ही पाठिंबा दिला आहे. यासाठी ते एक पाऊल पुढे आले आहे.
भारत-मालदीव संघर्ष : भारत आणि मालदीव वादात आता थेट इस्रायलने उडी घेतली आहे. मालदीवच्या काही खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर अपमानजनक भाष्य़ केले होते. यानंतर संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळली. बायकॉट मालदीव ट्रेंड होऊ लागले. मालदीवला जाणारे अनेक विमानं कंपन्यांनी रद्द केले. अनेकांनी मालदीवला जाण्याचा प्लान रद्द केला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भारताचे नवीन पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या चर्चेला इस्रायलनेही पाठिंबा दिला आहे.
भारतातील इस्रायली दूतावासाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर त्याच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. लक्षद्वीपला नवीन पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याच्या प्रस्तावावर ते काम करण्यास पूर्णपणे तयार असल्याचे इस्रायली दूतावासाने सांगितले आहे.
‘इस्रायल पर्यटन स्थळ बनण्यासाठी सज्ज’
इस्रायली दूतावासाने म्हटले आहे की, भारत सरकारच्या विनंतीवरून आम्ही गेल्या वर्षी लक्षद्वीप येथे डिसेलिनेशन कार्यक्रम सुरू करण्यासाठी गेलो होतो. भारताला पाठिंबा देत दूतावासाने सांगितले की, इस्रायल उद्यापासून या प्रकल्पावर काम सुरू करण्यास तयार आहे. लक्षद्वीपचे सौंदर्य दाखवणारे काही फोटो इस्रायलीच्या दूतावासाने शेअर केले आहेत.
काय आहे लक्षद्विप-मालदीव वाद?
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली. त्याने काही फोटो शेअर केले होते. ज्यावर मालदीवच्या काही नेत्यांनी आक्षेपार्ह टीका केली. सोशल मीडियावर भारत आणि पंतप्रधान मोदींबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्यानंतर वाद अधिकच चिघळला. यावर सरकारने भारतातील मालदीवच्या राजदूतांना बोलावले होते. यानंतर, देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने मालदीवची राजधानी माले येथे उपस्थित असलेल्या भारतीय उच्चायुक्तांना समन्स पाठवले.
लक्षद्विपबाबच गुगल सर्च वाढले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपला भेट दिली होती. यावेळी त्यांनी येथील सौंदर्य दाखवणारे काही फोटो शेअर केले होते. मोदींनी लक्षद्विपला पर्यटनस्थळ म्हणून चालना देण्यासाठी आवाहन केले होते. त्यानंतर जगभरात, लक्षद्वीपबाबत Google वर लोकं सर्च करत आहेत. गेल्या 20 वर्षांत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात लोकं लक्षद्विपबाबत सर्च करु लागले आहेत.