चांगली सून मिळाली म्हणून थाटामाटात घरी घेऊन आले, पण तिने असं काही केलं की सगळेच हादरुन गेले
Crime News : लग्नानंतर अनेक घटना अशा घडतात ज्यामुळे त्या बातम्या बनतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील बदाऊन जिल्ह्यातून पुढे आली आहे. ही बातमी वाचून तुम्हालाही धक्का बसेल. एका वधूने संपूर्ण कुटुंबाला असा झटका दिला की, ते आयुष्यभर विसरु शकणार नाहीत. लग्नानंतर जेव्हा सर्वजण जेवण करून खोलीत झोपले होते. तेव्हा सूनने डाव साधला. संपूर्ण कुटुंब […]
Crime News : लग्नानंतर अनेक घटना अशा घडतात ज्यामुळे त्या बातम्या बनतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील बदाऊन जिल्ह्यातून पुढे आली आहे. ही बातमी वाचून तुम्हालाही धक्का बसेल. एका वधूने संपूर्ण कुटुंबाला असा झटका दिला की, ते आयुष्यभर विसरु शकणार नाहीत. लग्नानंतर जेव्हा सर्वजण जेवण करून खोलीत झोपले होते. तेव्हा सूनने डाव साधला.
संपूर्ण कुटुंब आनंदी होतं पण…
संजू शर्माने पंजाबमधील एका तरुणीशी विवाह केला होता. दोन महिन्यांपर्यंत सर्व अलबेल होतं. चांगली सून मिळाल्याने संपूर्ण कुटुंब आनंदी होते, मात्र त्यानंतर सुनेच्या कृत्याने संपूर्ण कुटुंबच स्तब्ध झालं.
आरोपांनुसार, पंजाबची ही वधू घरातील रोख रक्कम आणि दागिने घेऊन पसार झाली. मेहुणीने तिला रोखण्याचा प्रयत्न केला असता तिने तिला जोराचा धक्का दिला आणि तेथून पसार झाली.
ट्रेंडिंग न्यूज : इस्लामिक देश इराणने भारतीयांना दिली मोठी भेट
काय आहे आरोप
संजू शर्मा यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत सांगितले आहे की, पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील कासू बेगी गावात राहणाऱ्या सुखवीरची मुलगी प्रीत हिच्याशी त्याचा विवाह झाला होता. 12 डिसेंबर रोजी दुपारी तिने खोलीला बाहेरून कुलूप लावून रोख आणि दागिने घेऊन पळ काढला. त्याची वहिनी शालू हिने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता तिने तिला ढकलून दिले आणि निघून गेली. कुलूप तोडले तोपर्यंत ती गायब झाली होती. पोलीस अजूनही या प्रकरणाचा तपास करत आहेत.