AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Crime | बलात्कार करून चार वर्षाच्या चिमुरडीची क्रूर हत्या; बिहारमधील संतापजनक घटना

रात्री दहा वाजेपर्यंत मुलगी घरी न परतल्याने तिच्या वडिलांसह इतर नागरिकांनी योगीराज रोडवर मुलीचा शोध घेतला. तेव्हा त्यांना एका तलावाच्या काठी असलेल्या झुडपात ती मुलगी रक्ताने माखलेल्या अवस्थेत दिसली. तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.

Bihar Crime | बलात्कार करून चार वर्षाच्या चिमुरडीची क्रूर हत्या; बिहारमधील संतापजनक घटना
बलात्कार करून चार वर्षाच्या चिमुरडीची क्रूर हत्या
| Edited By: | Updated on: Dec 11, 2021 | 5:51 PM
Share

पाटणा : बिहारमध्ये महिलांप्रमाणेच लहान मुलींच्याही सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मधेपुरा जिल्ह्यात एका 4 वर्षांच्या निष्पाप मुलीला नराधमाने फूस लावून पळवून नेले. नंतर बलात्कार करून तिची क्रूर हत्या केली. पीडित मुलीचा मृतदेह एका तलावाच्या काठी सापडला. ही अत्यंत लाजिरवाणी घटना उजेडात आल्यानंतर बिहारसह सर्वत्र खळबळ उडाली आहे. नराधमालाच वेळीच अटक होऊन त्याला कठोरात कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी मागणी सर्वच स्तरांतून होऊ लागली आहे.

पंचायत निवडणुकीच्या वातावरणाचा गैरफायदा

ही संतापदायी घटना मधेपुरा येथील जुने पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. 7 डिसेंबरच्या रात्री सर्व लोक पंचायत निवडणुकीच्या तयारीत व्यस्त होते. याच रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर उभ्या असलेल्या टेम्पोजवळ चार वर्षांची निरागस मुलगी इतर मुलांसोबत खेळत होती. यावेळी पीडित मुलीच्या घराशेजारी राहणारा सौरभ उर्फ ​​कोकलेश साहनी हा 24 वर्षीय युवक मोटारसायकलवरून तेथे आला. त्याने निरागस मुलीला फूस लावून दुचाकीवर बसवले व तिला योगीराज रोडवर घेऊन गेला. रात्री दहा वाजेपर्यंत मुलगी घरी न परतल्याने तिच्या वडिलांसह इतर नागरिकांनी योगीराज रोडवर मुलीचा शोध घेतला. तेव्हा त्यांना एका तलावाच्या काठी असलेल्या झुडपात ती मुलगी रक्ताने माखलेल्या अवस्थेत दिसली. तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.

आरोपीच्या भावाची मुलीच्या कुटुंबियांना धमकी

घटनेचा उलगडा झाल्यानंतर आलेल्या संशयातून मुलीचे कुटुंबीय स्थानिक लोकांसह आरोपी सौरभच्या घरी त्याच्याबाबत विचारपूस करायला गेले. त्यावेळी घरी असलेल्या सौरभच्या भावाने तिथल्या सर्वांना धमकावले. नंतर स्थानिक लोकांनी सौरभचा शोध घेतला असता मृतदेह सापडलेल्या तलावाजवळील काही अंतरावरच सौरभची मोटारसायकल आणि कपडे सापडले. त्याआधारे पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपी सौरभविरोधात जुने पोलीस ठाण्यात निष्पाप मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप करीत तक्रार दाखल केली आहे. तसेच आरोपी सौरभचा भाऊ सुरेंद्र साहनी याच्याविरोधात आरोपी लपवल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी अद्याप मोकाट; रहिवाशांमध्ये संतापाची लाट

चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्याची क्रूर घटना घडूनही आरोपी अद्याप मोकाट आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपीला अटक करणे अपेक्षित होते. मात्र पोलिसांनी आरोपीला अद्याप अटक केली नाही. त्यामुळे घटनेसह पोलिसांच्या सुस्त कारभाराविरोधात स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे. (Brutal murder of four-year-old girl after rape in Bihar)

इतर बातम्या

कोंढव्यातून विदेशी मद्य, विदेशी चलन , जुगारसाहित्यासह तब्बल 58 लाख रुपयांची रोकड जप्त ; एकाला अटक

West Bengal Suicide | सुहागरात साजरा करताच नवरदेवाची गळफास घेऊन आत्महत्या, नेमकं काय घडलं ज्याने पश्चिम बंगाल हादरलं

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.