कोण आहेत सुनिल जाखड, ज्यांचं नाव पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक आघाडीवर आहे? वाचा सविस्तर

पंजाबमधील काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? असा प्रश्न विचारला जात आहे. पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत एकूण 5 जण आहेत. त्यात पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल जाखड सर्वात आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे.

कोण आहेत सुनिल जाखड, ज्यांचं नाव पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक आघाडीवर आहे? वाचा सविस्तर
सुनिल जाखड, काँग्रेस नेते
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 7:01 PM

नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Capt. Amrinder Singh) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पंजाबच्या राजकारणात (Punjab Politics) मोठी खळबळ उडाली आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस नेतृत्वावर (Congress) नाराजी व्यक्त करत आज राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर पंजाबमधील काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? असा प्रश्न विचारला जात आहे. पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत एकूण 5 जण आहेत. त्यात पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल जाखड सर्वात आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे. (Sunil Jakhar is leading in the race for the post of CM of Punjab)

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण?

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी पाच नेत्यांची नावे चर्चेत आहेत. नवज्योतसिंग सिद्धू, सुनील जाखड, प्रतापसिंग बाजवा, राजकुमार वेरका आणि बेअंत सिंह यांचे नातू रवनीत सिंग बिट्टू यांची नावे चर्चेत आहेत.

सुनील जाखड यांचं नाव आघाडीवर

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांचे नावही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहे. काही लोक तर त्यांना मुख्यमंत्रीच समजत आहेत. सिद्धू यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद जाण्यापूर्वी जाखड प्रदेशाध्यक्ष होते. त्यामुळे जाखड यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंजाबवर मजबूत पकड असलेल्या नेत्यांपैकी जाखड एक आहेत. 2002मध्ये त्यांनी अबोहरमधून पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली होती. जाखड हे हिंदू आहेत. त्यामुळेही त्यांच्या पारड्यात मुख्यमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे. कृषी कायद्याचं समर्थन करणाऱ्या मोजक्याच नेत्यांपैकी ते एक आहेत. सुनील जाखड यांचे वडील बलराम जाखड हे काँग्रेसच्या बड्या नेत्यांपैकी एक होते. ते मध्यप्रदेशाचे राज्यपाल आणि लोकसभा अध्यक्षही होते.

सुनिल जाखड यांचं ट्वीट

‘गार्डियन नॉटच्या या पंजाबी व्हर्जनसाठी अलेक्झांड्रियाचे समाधान अंगिकारल्याबद्दल राहुल गांधींना शुभेच्छा. पंजाब काँग्रेसमधील वादावर तोडगा काढण्यासाठी घेतलेल्या या साहसपूर्ण निर्णयामुळे फक्त काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला नाही, तर अकाली दलाची मुळं हलली आहेत’, असं ट्वीट करुन सुनील जाखड यांनी राहुल गांधी यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा अखेर राजीनामा

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदस सिंग यांनी अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा (Resignation) दिलाय. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राज्यपालांची (Governor) भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, अमरिंदर सिंग यांच्या विरोधात 40 आमदारांनी दंड थोपटल्यानंतर आज संध्याकाळी काँग्रेसने तातडीची बैठक बोलावली आहे. यात विधीमंडळ नेता निवडण्यात येणार आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार रवीन ठुकराल यांनी दिली आहे. (Punjab Chief Minister Capt Amarinder Singh’s resignation)

आता हवं त्याला मुख्यमंत्री करा- कॅप्टन

‘दोन महिन्यात काँग्रेस आमदारांची दिल्लीत तिसऱ्यांदा बैठक बोलावण्यात आली आहे. याचा अर्थ असा की आता माझ्यावर विश्वास राहिला नाही किंवा मी सरकार चालवू शकलो नाही. मात्र, यामुळे मला अपमानित झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. आता हवं त्याला मुख्यमंत्री करा’, अशी संतप्त प्रतिक्रिया कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिली आहे. त्यामुळे आता अमरिंदर सिंग काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसंच कॅप्टनबाबत काँग्रेस नेतृत्व काय भूमिका घेणार? याकडेही संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे.

इतर बातम्या :

सरकार 5 वर्षे टिकणार हे तुम्हाला सातत्याने बोलावं का लागतं? आशिष शेलारांचा राऊतांचा खोचक सवाल

Amrindar Singh Resigns : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा अखेर राजीनामा! आता पुढचं पाऊल काय?

Sunil Jakhar is leading in the race for the post of CM of Punjab

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.