गुजरातला जाणाऱ्या कारमध्ये नोटांचं घबाड, सकाळपासून नोटा मोजता मोजता उलटली संध्याकाळ; अधिकारीही चक्रावले

राजस्थानच्या डुंगरपूर येथे दिल्लीहून गुजरातला जाणारी एक कार पोलिसांनी ताब्यात घेतली. (Car with crores of cash recovered from rajasthan)

गुजरातला जाणाऱ्या कारमध्ये नोटांचं घबाड, सकाळपासून नोटा मोजता मोजता उलटली संध्याकाळ; अधिकारीही चक्रावले
money
Follow us
| Updated on: May 23, 2021 | 10:27 AM

जयपूर: राजस्थानच्या डुंगरपूर येथे दिल्लीहून गुजरातला जाणारी एक कार पोलिसांनी ताब्यात घेतली. या कारची तपासणी करण्यात आली असता त्यात नोटांचं घबाड सापडलं. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या नोटा मोजण्यास सुरुवात केली. सकाळपासून या नोटांची मोजणी सुरु होती. नोटा एवढ्या प्रमाणावर होत्या की नोटा मोजता मोजता संध्याकाळ उलटली. त्यामुळे पोलीस आणि अधिकारीही चक्रावून गेले. (Car with crores of cash recovered from rajasthan)

कोट्यवधी रुपये घेऊन निघालेली ही कार दिल्लीहून गुजरातला जात होती, असं सांगितलं जातं. तसेच हा सर्व पैसा हवाल्याचा असल्याचाही प्राथमिक अंदाज आहे. शनिवारी डुंगरपूर जिल्ह्यातील बिछीवाडा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी नॅशनल हायवे रस्ता क्रमांक 8 वर एक कार अडवली. या कारची तपासणी केली असता त्यात नोटांचं घबाड आढळून आलं. एक दोन लाख नव्हे तर तब्बल 4.5 कोटी रुपये या कारमधून जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. सर्व रक्कम जप्त करण्यात आली असून आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. हा पैसा हवाला मार्गे आला असावा, असं डीएसपी मनोज सवारियां यांनी सांगितलं.

बँकांकडून मशीन मागवली

कारमध्ये प्रचंड प्रमाणात नोटा सापडल्याने पोलीसही चक्रावून गेले. ही रक्कम किती असेल याचा अंदाज पोलिसांना येत नव्हता. शिवाय हाताने नोटा मोजणंही शक्य नव्हते. पोलीस ठाण्यात नोट मोजण्याची मशीन नव्हती. त्यामुळे बँकांमधून नोट मोजण्याची मशीन मागवण्यात आली. सकाळपासून मशीनने या नोटा मोजण्यात आल्या. नोटा मोजता मोजता संध्याकाळ झाली. त्यामुळे अधिकाऱ्यांचीही दमछाक झाली. ही संपूर्ण रक्कम 4.5 कोटी असल्याचं पोलिसांनी सांगितलं. DL8CA X3573 या क्रमांकाच्या गाडीत या नोटा सापडल्या. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

बिछीवाडा पोलीस ठाणे हे गुजरातच्या हिम्मत नगर बॉर्डरवर आहे. येथून नॅशन हायवे जातो. या ठिकाणी नेहमीच तस्करी केली जाते. त्याचा पोलिसांकडून वेळोवेळी पर्दाफाशही केला जातो. मात्र, बिछीवाडा पोलिसांनी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम जप्त केली आहे. (Car with crores of cash recovered from rajasthan)

संबंधित बातम्या:

नौदल अधिकाऱ्याचा सहकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार, मुंबईतील शेअरिंग फ्लॅटमध्ये अत्याचार

आधी नवविवाहित लेक गेला, नंतर लग्नाच्या तोंडावर दुसऱ्या मुलाचाही मृत्यू, पिंपरीतील कुटुंबावर दुःखाचा डोंगर

LIVE | औरंगाबादमध्ये बांधांच्या वादावरून शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण

(Car with crores of cash recovered from rajasthan)

Non Stop LIVE Update
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.