Arvind Kejriwal | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयचे समन्स, अडचणी वाढणार?

देशातील लोकसभा निवडणुकीला एक वर्ष बाकी असताना मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष एकत्र येताना दिसत आहेत. विरोधी पक्षांमध्ये अरविंद केजरीवाल हे देखील महत्त्वाचे आहेत. या सगळया घडामोडी एकीकडे घडत असताना केजरीवाल यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे.

Arvind Kejriwal | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयचे समन्स, अडचणी वाढणार?
अरविंद केजरीवाल
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 7:01 PM

नवी दिल्ली : दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणाचा तपास आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणात आता सीबीआय आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी करणार आहे. सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना चौकशीचे समन्स बजावले आहेत. केजरीवाल यांना येत्या 16 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आपचे नेते खासदार संजय सिंह संध्याकाळी सहा वाजता पत्रकार परिषद घेऊन याबाबतची सविस्तर माहिती देणार आहेत. पण सीबीआयने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीचे समन्स देणं हे धक्कादायक आहे. त्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सीबीआयच्या चौकशीत आता अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

विशेष म्हणजे सीबीआयने या प्रकरणात याआधी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही अटक केली होती. सीबीआयने मनीष सिसोदिया यांना 26 फेब्रुवारीला अटक केली होती. सिसोदिया यांची ईडीनेदेखील चौकशी केली होती. त्यानंतर ईडीने जेलमधून मनीष सिसोदिया यांना अटक केली होती. ईडीने नंतर रिमांडवर घेऊनही सिसोदिया यांची चौकशी केली होती. या प्रकरणी सिसोदिया यांनी राउज ऐवन्यू कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. पण कोर्टाने तो अर्ज फेटाळला होता.

हे सुद्धा वाचा

नेमकं प्रकरण काय?

दिल्ली सरकारने राज्य उत्पादन शुल्क विभागासाठी 17 नोव्हेंबर 2021 रोजी नवीन पॉलिसी लागू केली होती. यानंतर वर्षभरात या विभागात घोटाळा झाल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी सीबीआयने चौकशी सुरु केली होती. या प्रकरणात मनीष सिसोदिया यांच्यासमवेत 15 जणंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं होतं. तसेच 22 ऑगस्ट 2022 रोजी ईडीनेदेखील या प्रकरणी मनी लाँन्ड्रिंगच्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. जवळपास सहा महिन्यांच्या तपासानंतर सीबीआयने मनीष सिसोदिया यांना अटक केली. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांना चौकशीचे समन्स बजावण्यात आलं आहे.

देशात विरोधक एकवटत असताना सीबीआयचे चौकशीचे समन्स

देशात सध्या विरोधक एकत्र येण्यासाठी रणनीती बांधत आहेत. देशात पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. नुकतंच दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत सर्व विरोधी पक्षांशी संवाद साधून एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा निर्णय घेण्यात आला. असं असताना आज दिल्लीतून अनपेक्षित बातमी समोर आलीय.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.