Cds bipin rawat death : हेलिकॉप्टर अपघातात बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका यांचाही मृत्यू
बिपीन रावत ज्या व्याख्यानासाठी गेले होते, त्या व्याखानाला त्यांच्या पत्नी मधुलिका रावत याही गेल्या होत्या. त्याही बिपीन रावत यांच्यासोबत याच हेलिकॉप्टरने प्रवास करत होत्या. या भीषण हेलिकॉप्टर अपघातात बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचाही मृत्यू झाला आहे.
तामिळनाडू : आजचा दिवस देशासाठी आणि भारतीय सैन्यसाठी काळा दिवस ठरला आहे. कारण आज तामिळनाडूत झालेल्य हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत यांचाच मृत्यू झालाय. फक्त बिपीन रावतच नाही तर सेनेतील इतर काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनाही या अपघातात देशाने गावमलं आहे. त्यामुळे देशात शोककळा पसरली आहे. या अपघातानंतर देशात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. बिपीन रावत यांच्या निधनाची माहिती अधिकृतरित्या देण्यात आली आहे.
मधुलिका रावत यांचाही मृत्यू
बिपीन रावत ज्या व्याख्यानासाठी गेले होते, त्या व्याखानाला त्यांच्या पत्नी मधुलिका रावत याही गेल्या होत्या. त्याही बिपीन रावत यांच्यासोबत याच हेलिकॉप्टरने प्रवास करत होत्या. या भीषण हेलिकॉप्टर अपघातात बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचाही मृत्यू झाला आहे. मधुलिका रावत या आर्मी वेल्फेअर फाऊंडेशनशीह जोडल्या गेल्या होत्या. त्यामुळे त्या अनेक कार्यक्रमात सीडीएस बिपीन रावत यांच्याबरोबर दिसून येत असत.
अपघातात आणखी 11 लोकांचा मृत्यू
या अपघातात देशाने आपला सीडीएस तर गमावला आहेच, पण देशाने आणखी 11 लोक या गमावले आहेत. बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि त्यांच्यासह आणखी 11 लोकांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. याआधी 2015 मध्येही बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. मात्र त्यातून ते मरणाला मात देऊन वाचला होते. मात्र तामिळनाडूतील हेलिकॉप्टर अपघातातून ते वाचू शकले नाहीत. या सर्व अधिकाऱ्यांच्या मृत्यूने देशावर सध्या शोककळा पसरली आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्यासह सर्वांनी या दुर्घटनेनंतर शोक आणि हळहळ व्यक्त केली आहे. हळहळ व्यक्त करत राजनाथ सिंह, अमित शाह तसेच राहुल गांधी यांनीही ट्विट करून हळहळ व्यक्त केली आहे.