Rip bipin rawat : मधुलिका रावत यांचं देशासाठीचे हे योगदान माहीत आहे का? वाचा सविस्तर
नवी दिल्ली : देशात सध्या सीडीएस बिपीन रावत आणि अन्य जवानांच्या मृत्यूने शोकाकूल वातावरण आहे. या अपघातात त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचाही मृत्यू झाला आहे. मधुलिका रावत या आर्मी वेल्फेअरशी जोडल्या गेल्या होत्या त्यामुळे देशभर विविध घटकांसाठी काम करत होत्या. त्यामुळेच त्या अनेकदा बिपीन रावत यांच्यासोबत अनेक कार्यक्रमात दिसून येत असे. आजही त्या बिपीन रावत […]
नवी दिल्ली : देशात सध्या सीडीएस बिपीन रावत आणि अन्य जवानांच्या मृत्यूने शोकाकूल वातावरण आहे. या अपघातात त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचाही मृत्यू झाला आहे. मधुलिका रावत या आर्मी वेल्फेअरशी जोडल्या गेल्या होत्या त्यामुळे देशभर विविध घटकांसाठी काम करत होत्या. त्यामुळेच त्या अनेकदा बिपीन रावत यांच्यासोबत अनेक कार्यक्रमात दिसून येत असे. आजही त्या बिपीन रावत यांच्याबरबरच होत्या आणि त्याचवेळी काळाने घाला घातला आहे.
- आर्मी वाईव्स वेल्फेअर ओसोसिएशनच्या अध्यक्ष
सीडीएस बिपीन रावत यांच्या पत्नी AWWA म्हणजेच आर्मी वाईव्स वेल्फेअर ओसोसिएशनच्या अध्यक्ष होत्या.
2. रावत यांचा संपूर्ण परिवार देश सेवेत
बिपीन राव यांचे वडील सैन्यात होते, तर पत्नी गृहिणी असूनही मोठ्या प्रमाणात समाजसेवेत सहभागी होत्या.
3. सेनेतील जवानांच्या परिवारासाठी मोठं योगदान
सैन्यातील जवानांच्या पत्नी, मुले, आई-वडील यांच्यासाठी त्यांनी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून मोठं काम केलंय.
4. शहिदांच्या पत्नींना विशेष मदत
मधुलिका रावत या सैनिकांच्या परिवाराच्या कल्याणासाठी तर झटतच होत्या, मात्र त्या शहिद सैनिकांच्या पत्नी आणि परिवाराच्या मदतीसाठीही कार्यरत होत्या.
5. याचवर्षी सेनाजल योजनेचा प्ररंभ
मधुलिका रावत यांनी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून याचवर्षी सेनाजल योजनेला सुरूवात केली होती. इतर कंपन्या, किंवा विदेशी कंपन्याकडून पाण्याची बाटली खरेदी करण्याऐवजी सेनेकडून खरेदी केली जावी आणि त्यातून मिळणारा नफा, सैन्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरात यावा हाच त्याचा उद्देश होता. तसेच त्याच पैशातून सैन्याच्या परिवारालाही मोठी मदत झाली असती. मात्र त्यांच्या जाण्याने त्यांची ही संस्थाही आता पोरकी झाली आहे.