VIDEO | हा तोच जनरल रावतांच्या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा Video आहे? ढगात शिरताना शेवटी काय दिसतंय?

हा व्हिडीओ नक्की कुठला आहे? कधीचा आहे? कोणी शूट केला आहे? जनरल बिपीन रावत प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरचा आहे का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. या व्हिडीओची सत्यता अजून समोर आलेली नाही.

VIDEO | हा तोच जनरल रावतांच्या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा Video आहे? ढगात शिरताना शेवटी काय दिसतंय?
बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर क्रॅशचा कथित व्हायरल व्हिडीओ
Follow us
| Updated on: Dec 09, 2021 | 10:59 AM

मुंबई : देशाचे पहिले सीडीएस म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (Chief Of Defense Staff) म्हणजेच संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत (Gen Bipin Rawat) यांचं हेलिकॉप्टर अपघातात (helicopter crash) निधन झालं. हा अपघात होण्याआधीचे काही क्षण नेमकं काय घडलं, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. बिपीन रावत प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरला अपघात होण्यापूर्वीचा एक कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हेलिकॉप्टरची शेपटी ढगात लुप्त होतानाचे क्षण या व्हिडीओमध्ये कैद झाले आहेत.

हा व्हिडीओ नक्की कुठला आहे? कधीचा आहे? कोणी शूट केला आहे? जनरल बिपीन रावत प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरचा आहे का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. ‘टीव्ही9 मराठी’ने या दाव्यांची पडताळणी केलेली नाही. या व्हिडीओची सत्यता अजून समोर आलेली नाही. केवळ सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टच्या द्वारे हा दावा केला जात आहे.

पण वृत्तसंस्था ANI नेही हा व्हिडीओ ट्विट करत जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचे हे शेवटचे क्षण असल्याचा दावा केलाय. त्यांनीही सोर्स म्हणून स्थानिकांचा हवाला दिला आहे. त्यामुळेच व्हिडीओ व्हायरल असला तरी, तो बिपिन रावत यांच्यासह 14 जणांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टरच असल्याची शक्यता बळावत चाललीय. विशेष म्हणजे हेलिकॉप्टरचा आवाज ऐकत काही स्थानिक ढगाकडे बघतायत आणि ते हेलिकॉप्टर एकदम दाट ढगात गायब होताना दिसतंय. व्हिडीओत वातावरण खराब असल्याचही स्पष्ट दिसतंय.

हेलिकॉप्टरमध्ये कोण कोण होतं?

या अपघातात बिपीन रावत यांच्यासह पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर, NK गुरसेवक सिंग, NK जितेंद्र कुमार, L/NK विवेक कुमार, L/NK बी. साई तेजा, हवालदार सतपाल यांचाही समावेश होता. हेलिकॉप्टरच्या क्रू मेंबरपैकी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ :

दरम्यान, तामिळनाडू दुर्घटनेबाबत आज लोकसभेत राजनाथ सिंह स्पष्टीकरण देणार आहेत. हेलिकॉप्टर दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, याविषयी ते सांगतील. घटनास्थळी ब्लॅक बॉक्स सापडल्याची माहिती आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनेचं नेमकं कारण स्पष्ट होण्यास मदत होण्याची चिन्हं आहेत.

सीडीएस बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचं पार्थिव गुरुवारी सायंकाळपर्यंत एका सैन्यदलाच्या विमानानं राजधानी दिल्लीमध्ये आणलं जाईल. त्यानंतर शुक्रवारी सकाळी रावत आणि त्यांच्या पत्नीचं पार्थिव त्यांच्या घरी नेण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत अंत्यदर्शानासाठी वेळ देण्यात येईल.

संबंधित बातम्या :

Soundarya | चार्टर्ड विमान कोसळून ‘सूर्यवंशम’ फेम सौंदर्याचाही गेलेला बळी, पेटलेल्या साडीने जीव वाचवण्याची धडपड ठरलेली व्यर्थ

CDS : जनरल रावत यांची जागा कोण घेणार? नवे सीडीएस म्हणून मराठमोळ्या अधिकाऱ्याचं नाव आघाडीवर

Rawat Helicopter Crash: आणखी 90 सेकंद असते तर रावत अजूनही देशाची कमान सांभाळत असते, नेमकं काय घडलं दीड मिनिटात?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.