Army helicopter crash : पंतप्रधान मोदींनी बोलवली तातडीची बैठक, सरक्षणमंत्री, गृहमंत्रीही राहणार उपस्थित
नवी दिली : तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर दिल्लीतल्या हलचाली वाढल्या आहेत. सीडीएस बिपीन रावत यांच्या घरी राजनाथ सिंह जाऊन आले आहेत. तर त्यांनी दिल्लीत सुरक्षा दलाची बैठकही घेतली आहेत. बिपीन रावत यांच्या घराबाहेरील सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. याबाबत केंद्र सरकार उद्या संसदेत अधिकृत माहिती देण्याची शक्यता आहे. हेलिकॉप्टर अपघातनंतर दिल्लीत बैठका वाढल्या आहेत. केंद्र सरकारकडून […]
नवी दिली : तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर दिल्लीतल्या हलचाली वाढल्या आहेत. सीडीएस बिपीन रावत यांच्या घरी राजनाथ सिंह जाऊन आले आहेत. तर त्यांनी दिल्लीत सुरक्षा दलाची बैठकही घेतली आहेत. बिपीन रावत यांच्या घराबाहेरील सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. याबाबत केंद्र सरकार उद्या संसदेत अधिकृत माहिती देण्याची शक्यता आहे. हेलिकॉप्टर अपघातनंतर दिल्लीत बैठका वाढल्या आहेत. केंद्र सरकारकडून लवकर काही तातडीची पाऊलं उचलली जाण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदींनी बोलवली तातडीची बैठक
अपघानंतर केंद्र सरकारच्या हलचाली वाढल्या आहेत. या अपघातात 14 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर एक गंभीर जखमी असल्याचं कळतंय. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी तातडीची बैठक बोलवली आहे. केंद्र सरकार काही तातडीने पाऊले उचलण्याची शक्यता आहे. या बैठकीला देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह हेही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
वायुप्रमुख घटनास्थळाकडे रवाना
वायुप्रमुख तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. घटनास्थळी जाऊन ते दुर्घटनेची पाहणी करणार आहेत. तर राजनाथ सिंह हेही घटनास्थळी भेट देण्याची शक्यता आहे.
देशभर हळहळ व्यक्त
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यानी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. या घनेनंतर देशभर हळहळ व्यक्त होताना दिसून येत आहे. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघात होताच हेलिकॉप्टरने पेट घेतला. ज्या झाडांवर हेलिकॉप्टर कोसळलं ती झाडंही कापली गेली अन् झाडांनीही पेट घेतला.