AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मविआ मोठे यश, केंद्रीय निवडणूक आयोगाने उचलले हे पाऊल, थेट आता…

election commission of india: केंद्रीय निवडणूक आयोगाने विरोधकांना चर्चेसाठी बोलवले आहे. तुमच्या शंकांचे निरासन करण्यासाठी ३ डिसेंबर रोजी चर्चेसाठी येण्याचे निमंत्रण केंद्रीय निवडणूक आयोगाने महाविकास आघाडी आणि मतदान प्रक्रियेवर शंका उपस्थित करणाऱ्या विरोधकांना दिले आहे.

मविआ मोठे यश, केंद्रीय निवडणूक आयोगाने उचलले हे पाऊल, थेट आता...
evm machine
| Updated on: Dec 01, 2024 | 12:01 PM
Share

Election Commission of India Call Meeting: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठा फेरफार झाल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून सातत्याने केला जात आहे. ईव्हीएम आणि राज्यात वाढलेल्या मतदानाविरोधात महाविकास आघाडीकडून सातत्याने वक्तव्य केली जात आहे. तसेच अनेक ठिकाणी आंदोलन केले जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने मविआच्या शंकांचे निरासन केले होते. तसेच सर्व आरोप फेटाळले होते. त्यानंतर महाविकास आघाडीने भूमिका बदलली नाही. त्यामुळे आता थेट केंद्रीय निवडणूक आयोगाने विरोधकांना चर्चेसाठी बोलवले आहे. तुमच्या शंकांचे निरासन करण्यासाठी ३ डिसेंबर रोजी चर्चेसाठी येण्याचे निमंत्रण केंद्रीय निवडणूक आयोगाने महाविकास आघाडी आणि मतदान प्रक्रियेवर शंका उपस्थित करणाऱ्या विरोधकांना दिले आहे.

शरद पवार यांच्याकडूनही शंका

महाविकास आघाडीतील सर्व पक्ष राज्यातील विधानसभा निवडणुकी प्रक्रियेवर संशय व्यक्त करत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात वक्तव्य केले होते. परंतु आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी या विषयावर भूमिका मांडली नव्हती. जोपर्यंत आपल्याकडे ठोस माहिती येत नाही, तोपर्यंत ईव्हीएमवर आपण बोलणार नाही, असे ते म्हणाले होते. परंतु शनिवारी त्यांनीही ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली.

शरद पवार म्हणाले, ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते. त्याबाबत आम्हाला काही लोकांनी त्याचे प्रात्यक्षिक करुन दाखवले होते. पण आम्ही विश्वास ठेवला नाही. मात्र, आता ईव्हीएम हॅक होऊ शकते हे आमच्याही लक्षात आले आहे, असे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोग तरी चुकीचे वागणार नाही, असे आम्हाला वाटत होते, असे शरद पवार म्हणाले.

राज्याचे लक्ष बैठकीकडे

शेवटच्या दोन तासांत ७६ लाख मतदान कसे वाढले? हा प्रश्न काँग्रेसकडून सातत्याने उपस्थित केला जात आहे. त्यावर राज्या निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले होते. परंतु त्यानंतरही राजकीय पक्षांच्या शंका कायम आहे. यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व विरोधकांना चर्चेसाठी बोलवले आहे. या चर्चेत आता विरोधक काय भूमिका मांडतात? याकडे देशाचे लक्ष लागले आहे. आयोगाकडून काँग्रेसला सर्व कायदेशीर समस्यांचे निरसन केले जाईल, असे आश्वासन दिले आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.