कोरोना काळात अनाथ झालेल्यांसाठी 10 लाखांचा निधी, मोदींची मोठी घोषणा; काय आहे योजना?, वाचा!
कोरोना काळात अनाथ झालेल्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. (central government announces special scheme for COVID-19 orphans under PM CARES)
नवी दिल्ली: कोरोना काळात अनाथ झालेल्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. ज्या मुलांनी कोरोना काळात आई किंवा वडिलांना किंवा या दोघांनाही गमावलं असेल अशा मुलांना केंद्र सरकार आर्थिक मदत करणार आहे. अशा मुलांना वयाच्या 18 वर्षी मासिक सहायता राशी आणि वयाच्या 23 व्या वर्षी पीएम केअर्स फंडातून 10 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. (central government announces special scheme for COVID-19 orphans under PM CARES)
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक मुलांनी आपल्या आई-वडिलांना किंवा त्यापैकी एकाला गमावलं आहे. त्यामुळे अनेक मुलं अनाथ झाले आहेत. अशा मुलांना उभं करण्यासाठी केंद्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजने अंतर्गत या मुलांना आर्थिक मदत केली जाणार आहे. आई-वडील किंवा त्यापैकी एकाला गमावलेल्या मुलांना वयाच्या 18 व्या वर्षी मासिक सहायता राशी आणि वयाच्या 23 व्या वर्षी पीएम केअर्समधून 10 लाख रुपये देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
पाच लाखापर्यंतचा आरोग्य विमाही
त्याशिवाय या मुलांना मोफत शिक्षण देण्यावरही भर दिला जाणार आहे. या मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज दिलं जाईल. त्यासाठीचं व्याज पीएम केअर्स फंडातून दिलं जाईल. या अनाथ झालेल्या मुलांना वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत आयुषमान भारत योजने अंतर्गत पाच लाखापर्यंतचा आरोग्य विमाही दिला जाणार आहे. त्यासाठीचं प्रीमियम पीएम केअरमधूनच भरलं जाणार आहे.
मुलांची जबाबदारी आपलीच
मुलं देशाचं भविष्य आहेत. त्यामुळे आम्ही मुलांच्यासाठी सर्वकाही करण्याचा प्रयत्न करत आहोत. समाज म्हणून हे आपलं कर्तव्यच आहे. मुलांची काळजी घेऊन त्यांचं भविष्य उज्वल बनिवण्याचा हा आमचा प्रयत्न आहे, असं मोदी म्हणाले.
सोनिया गांधींची मागणी
दरम्यान, कोरोनामुळे आई-वडील किंवा त्या दोघांपैकी एकाला गमवावे लागलेल्या मुलांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली होती. सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तसं पत्रं लिहिलं होतं. (central government announces special scheme for COVID-19 orphans under PM CARES)
VIDEO : SuperFast 100 News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 29 May 2021https://t.co/JS2cFjJgqD
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 29, 2021
संबंधित बातम्या:
कोरोनातून सावरताच लहान मुलांना नव्या आजाराचा धोका, जाणून घ्या लक्षणं काय ?
आता 12 कोटी विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात पैसे जमा होणार, केंद्र सरकारची ‘ही’ मोठी घोषणा
ममतादीदींनी मोदींना अर्धा तास वाट पाहायला लावली; नुकसानीचा अहवाल दिला अन् निघून गेल्या
(central government announces special scheme for COVID-19 orphans under PM CARES)