Chandigarh Mayor|चंदीगडमध्ये जादूची कांडी फिरली; मुसंडी मारूनही ‘आप’ सत्तेपासून दूर, भाजपचा महापौर!

'आप'ने या ठिकाणी 14 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपकडे 12 जागा आहेत. त्यामुळे या दोघांमध्येच खरी लढत होती. मात्र, झाले असे की...

Chandigarh Mayor|चंदीगडमध्ये जादूची कांडी फिरली; मुसंडी मारूनही 'आप' सत्तेपासून दूर, भाजपचा महापौर!
Sarabjit Kaur
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 3:22 PM

चंदीगडः केंद्रशासित प्रदेश चंदीगडमध्ये महापौर पदाच्या निवडणुकीत शनिवारी एक अफलातून निकाल लागला. चक्क बहुमताच्या जवळचा आकडा गाठत जोरदार मुसंडी मारलेल्या ‘आप’ला महापौर पदाची खुर्ची गमवावी लागली. अन् हे पद आपसुकपणे भाजपच्या पारड्यात आले. त्यामुळे महापालिकेत जोरदार हंगामा पाहायला मिळाला. एका अतिशय इंटरेस्टिंग निवडणुकीची ही बित्तमबातमी…

‘आप’ने मारली मुसंडी

चंदीगडच्या महापालिकेत एकूण 35 जागा आहेत. या निवडणुकीचे निकाल 14 डिसेंबर रोजी लागले. यावेळी प्रत्यक्षात कोणाकडेही बहुमत नव्हते. मात्र, पहिल्यांदाच 14 जागा जिंकून आम आदमी पक्षाने प्रस्थापितांना जोरदार धक्का दिला. तर भाजपला 12, काँग्रेसला 8, तर अकाली दलाचा 1 नगरसेवक निवडून आला. या नवनिर्वाचित नगरसेवकांना एक जानेवारी रोजी शपथ देण्यात आली.

नगरसेवक सहलीवर

भाजपने माजी नगरसेवक जगतार सिंह जग्गा यांच्या पत्नी सरबजीत कौर यांना महापौर पदाचा उमेदवार जाहीर केले होते. ‘आप’कडून अंजू कत्याल यांना उमेदवारी देण्यात आली. काँग्रेसने निवडणुकीत सहभागी होणार असल्याची घोषणा केली. मात्र, त्यांनी प्रत्यक्षात उमेदवार दिला नाही. सर्व पक्षांना या निवडणुकीत मोठा घोडेबाजार होण्याची भीती होती. त्यामुळे काँग्रेसने आपल्या नगरसेवकांना राजस्थानच्या जयपूरला पाठवले. ‘आप’चे नगरसेवक दिल्ली, कसौले येथे तळ ठोकून होते. भाजपने आपल्या नगरसेवकांना शिमल्याला पाठवले. हे सारे नगरसेवक शुक्रवारी सायंकाळी वापस आले होते.

अन् कात्रजचा घाट दाखवला

‘आप’ने या ठिकाणी 14 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपकडे 12 जागा आहेत. त्यामुळे या दोघांमध्येच खरी लढत होती. मात्र, झाले असे की काँग्रेसने देवेंद्र सिंह बाबला यांना पक्षातून बाहेर काढले आहे. या बाबला यांनी नवनिर्वाचित नगरसेवक पत्नी हरप्रीत कौर बबलांसह भाजपला साथ दिली. दुसरीकडे भाजपचे खासदार किरण खेर यांना एक मत टाकण्याचा अधिकार आहे. त्यामुळे भाजपकडे बलाबल 14 झाले. या बळावर त्यांनी महापौरपदी बाजी मारली.

‘आप’चे आंदोलन

एकीकडे पंजाबच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. दुसरीकडे चंदीगढमध्ये मोठी उलथापालथ झालेली पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या नगरेसवकांनी केला आहे. आपच्या नगरसेवकांनी महापौरांच्या खुर्चीच्या मागे धरणे आंदोलन सुरू केले. महापालिकेच्या आत मार्शल बोलावण्यात आले. जोरदार हंगामा झाल्याचा पाहायला मिळाला. आपच्या नगरसेवकांनी महापौरांच्या खुर्चीशेजारीच ठिय्या मांडला. हातातोंडाशी आलेली सत्ता भाजपने हिसकावल्यामुळे ‘आप’चा तीळपापड झाल्याचे पाहायला मिळत आहे.

इतर बातम्याः

Fake promotions|महसूल अधिकाऱ्यांच्या बनावट पदोन्नत्या; प्रती 41 कार्यालये, मंत्र्यांना पाठवल्याने खळबळ

Gold Price|ओ मेरे सोना रे, सोना रे, सोना…भावात चक्क 600 रुपयांची घसरण, चांदीही 60 हजारांखाली!

Helmet Compulsory|विनाहेल्मेट प्रवेश दिल्याने प्राचार्य, मालमत्ता अधिकाऱ्यांवर गुन्हा; नाशिकमध्ये धडक कारवाई!

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.