Chhath Puja 2021: दिल्लीत यमुना नदीच्या विषारी फेसाच्या पाण्यात भाविकांनी केली छठ पुजा ! बघा फोटो
ही पुजा (chhat puja) चार दिवस चालते. खास करून उत्तर भारतात हा सण साजरा केला जातो. यातच दिल्लीमध्ये यमुना नदीचे विषारी फेसाचे (polluted yamuna river in Delhi) भयावक फोटो समोर आले, ज्यात भाविकांनी उभं राहून, स्नान करुन सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केले !
नवी दिल्लीः आज छठ पुजेच्या सणाला सुरुवात झाली आहे आणि देशभरात भाविकांनी नदीत स्नान करुन प्रथेनुसार धार्मिक विधी केले. ही पुजा चार दिवस चालते. खास करून उत्तर भारतात हा सण साजरा केला जातो. यातच दिल्लीमध्ये यमुना नदीचे विषारी फेसाचे भयावक फोटो समोर आले, ज्यात भाविकांनी उभं राहून, स्नान करुन सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केले ! (Chhath puja festival begins in India meanwhile in Delhi women perform puja in polluted Yamuna river water)
छठपूजेच्या दिवशीचं हे यमुना नदीचं असे चित्र समोर येण्याची ही पहिली वेळ नाही. यमुनेच्या पाण्यात प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने दिल्ली सरकारने अनेकवेळा चिंता व्यक्त केली आहे, मात्र आजतागायत या समस्येवर तोडगा निघालेला नाही. आणि स्त्रीया धार्मिक विधीसाठी दरवर्षी अशा विषारी पाण्यात पुजा करतात.
People take dip in Yamuna river near Kalindi Kunj in Delhi on the first day of #ChhathPuja amid toxic foam pic.twitter.com/nrmzckRgdq
— ANI (@ANI) November 8, 2021
वायू प्रदूषणासोबत आता जलप्रदूषणात वाढ
राजधानी दिल्लीत दिवाळीनंतर वायू प्रदूषणासोबतच आता जलप्रदूषणही झपाट्याने वाढ झालीये. यमुनेच्या पाण्यात अमोनियाची पातळी लक्षणीय वाढली आहे. कारखाने, रंगरंगोटी उद्योग, धोबी घाट आणि घरांमध्ये वापरल्या जाणार्या डिटर्जंट्समुळे सांडपाण्यात फॉस्फेटचे प्रमाण वाढल्याने यमुनेच्या पाण्यात विषारी फेस तयार होतो, असं मानलं जातं. विषारी पांढर्या फेसामुळे रोगराई पसरण्याचा धोका वाढतो. अशा लोकांना सर्वाधिक धोका असतो जे यमुनेचे पाणी स्नानासाठी वापरतात. त्यात छठ पूजेच्या पहिल्या दिवशी दिल्लीतील कालिंदी कुंजजवळ यमुना नदीत विषारी फेस आला असताना स्त्रीयांनी पूजा केली.
Other News
पंढरपूरकडे जाणारे हे मार्ग भागवत मार्गाची पताका आणखी उंचावेल: पंतप्रधान नरेंद्र मोदीhttps://t.co/AY2C38r6zm#narendramodi | #cmuddhavthackeray | #nitingadkari | #bjp | #pandharpur
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 8, 2021