chhattisgarh naxal attack : गुप्तचर विभागाकडून हल्ल्याची होती सूचना, त्यानंतरही खरबदारी न घेतल्याने नक्षलींना मिळाली संधी, ११ जवान शहीद

chhattisgarh naxal attack : छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला घडवून आणला आहे. या हल्ल्यामध्ये 11 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यांशी संपर्क केला.

chhattisgarh naxal attack : गुप्तचर विभागाकडून हल्ल्याची होती सूचना, त्यानंतरही खरबदारी न घेतल्याने नक्षलींना मिळाली संधी, ११ जवान शहीद
Follow us
| Updated on: Apr 28, 2023 | 5:12 PM

रायपूर : छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला घडवून आणला आहे. या हल्ल्यामध्ये 11 जवान शहीद झाले आहेत. दंतेवाडा येथील अरणपूर येथे जिल्हा राखीव रक्षक दल (DRG) दलाच्या वाहनावर IED स्फोटांनी हल्ला करण्यात आला. जवान ऑपरेशनसाठी बाहेर पडले होते. दरम्यान पोलिसांनी नक्षलवाद्यांना घेरले आहे. आता नक्षली आणि पोलीस यांच्यात धुमश्चक्री सुरु आहेत. शहीद जवानांमध्ये 10 DRG सैनिक आणि एका ड्रायव्हरचा समावेश आहे. अरणपूरच्या पालनार भागात नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला.

असा घडला हल्ला

हे सुद्धा वाचा

गुप्तचर विभागाने या भागात नक्षली असल्याचा संदेश दिला होता. त्यानंतर एसओपीचे पालन झाले नाही.  त्यामुळे नक्षलींना संधी मिळाली. एसओपीनुसार जवान एक गाडी जाऊ शकत नाही. ऑपरेशन दरम्यान त्यांना पायीच जावे लागते. परंतु कोबिंग ऑपरेशन सुरु करण्यात आले आणि जवान गाडीत गेले. यावेळी २५० जवानांच्या वेगवेगळ्या तुकड्या करण्यात आल्या. त्यातील एका तुकडीवर हा हल्ला करण्यात आला. दरम्यान हा हल्ला झाला तेव्हा एसओपीचे पालन करण्यात आले नसल्याचा आरोप होत आहे.

नक्षलींना सोडणार नाही- बघेल

या हल्ल्याबाबत मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, नक्षलवाद्यांना सोडले जाणार नाही. ही घटना अत्यंत दु:खद आहे. नक्षलवाद्यांविरुद्धची आमची लढाई अंतिम टप्प्यात आहे. नियोजनबद्ध पद्धतीने नक्षलवाद उखडला जाईल.

घटनास्थळी रुग्णावाहिका रवाना

घटनास्थळी दोन रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. या राज्याचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी या हल्ल्याबाबत भूपेश बघेल यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की बघेल प्रत्येक हल्ल्यानंतर तेच बोलतात पण ठोस पावले उचलली जात नाहीत.

छत्तीसगड-दंतेवाडा येथे शहीद झालेल्या जवानांची नावे

  • १) जोगा सुडी
  • २) मुन्ना राम कडती
  • ३) संतोष तामो
  • ४) दुल्गो मण्डावी
  • ५) लखमु मरकाम
  • ६) जोगा कवासी
  • ७) हरिराम मण्डावी
  • ८) राजु करटम
  • ९) जयराम पेडियाम
  • १०) जगदिश कवासी
  • ११) धनीराम कवासी चालक सिविलियन

अमित शहा यांनी केला फोन

नक्षलवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी हा हल्लाबाबत चर्चा केली. तसेच राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

बस्तरचे आयजी सुंदरराज यांनी सांगितले की, जवान ऑपरेशनसाठी जात होते. दरम्यान, अरणपूरच्या पालनार भागात नक्षलवाद्यांनी आयईडीने जवानांनी वाहन उडवल्याचं, आयजी सुंदरराज यांनी सांगितलं. नक्षलवाद्यांच्या हल्ल्याची पद्धत अजिबात बदललेली नाही.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.