AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरन्यायधीश रामन्नांचं स्वप्न साकारलं, आता हैदराबादमध्ये आंतरराष्ट्रीय लवादाचं केंद्र

यावेळेस सरन्यायधीशांनी माजी पंतप्रधान नरसिंहराव यांचीही आठवण काढली. नरसिंहरावांच्याच काळात लवाद कायदा कसा अस्तित्वात आला हेही रामन्ना यांनी आवर्जून सांगितलं. मंत्री केटीआर यांनी ह्या लवाद केंद्रामुळे हैदराबादच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना व्यक्त केली.

सरन्यायधीश रामन्नांचं स्वप्न साकारलं, आता हैदराबादमध्ये आंतरराष्ट्रीय लवादाचं केंद्र
सरन्यायधीश एन.व्ही. रामन्ना यांची आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र उभारण्याची स्वप्नपूर्ती
| Edited By: | Updated on: Aug 20, 2021 | 7:52 PM
Share

भारतीय न्यायव्यवस्थेनं आज आणखी एक पाऊल पुढं टाकलं आहे. कारण तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये आता आंतरराष्ट्रीय लवादाचं केंद्र सुरु झालय. सरन्यायधीश एन.व्ही. रामन्ना यांच्या उपस्थितीत तसा करार पार पडला. यावेळेस सुप्रीम कोर्टाचे जजेस एल नागेश्वरा राव, आर सुभाष रेड्डी, तेलंगणाचे मंत्री केटीआर, इंद्राकरण रेड्डी यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री केसीआर यांचे यावेळेस सरन्यायधीशांनी आभार मानले. विशेष म्हणजे तीन महिन्यापुर्वी असं एक आंतरराष्ट्रीय लवादाचं केंद्र असावं अशी इच्छा रामन्ना यांनी व्यक्त केली होती. हे त्यांचं स्वप्न असल्याचं रामन्ना म्हणाले होते. तेच स्वप्न अवघ्या तीन महिन्यात पूर्ण करण्यात यश मिळवलं आहे.

कंपन्यांना फायदा होणार आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राचा उपयोग प्रामुख्यानं वेगवेगळ्या कार्पोरेट कंपन्यांना होणार आहे. गुंतवणूकीसंबंधी सकारात्मक वातावरण रहाण्यासाठीही याचा फायदा होईल. वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या देशात गुंतवणूक करतात. काम करतात. स्थानिक कायद्यांना पाळत व्यापार करावा लागतो. पण काही वेळेस यातून वाद विवाद निर्माण होतात. दोन कंपन्यांमध्ये किंवा सरकार आणि कंपन्यांमध्ये वाद होतात. ‘ते सोडवण्यासाठी ह्या आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राचा उपयोग होईल’ असं सरन्यायधीश रामन्ना म्हणाले. आतापर्यंत असे वाद सोडवण्यासाठी कंपन्या सिंगापूर, दुबई इथल्या लवाद केंद्राचा वापरत करत असत. त्यासाठी भारतीय कंपन्यांनाही बाहेर जावं लागायचं. पण आता हैदराबादच्या आंतरराष्ट्रीय लवाद केंद्रामुळे कंपन्यांसाठी प्रक्रिया सोपी होणार आहे.

तेलंगणाची जबाबदारी 1926 साली पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राची सुरुवात झाली. नंतरच्या काळात जसही जग बदलत गेलं तशी त्याची गरज अधोरेखीत झाली. जागतिकीकरणाचं धोरण स्वीकारल्यानंतर तर आंतरराष्ट्रीय व्यापार करणाऱ्या कंपन्यांची ही तर एक प्रमुख गरज आहे. वेगवेगळे वाद सोडवण्यासाठी उद्योगपती आता हैदराबादला येतील अशी आशा सरन्यायधीशांनी यावेळेस व्यक्त केली. जस्टीस नागेश्वरा राव यांनी याची स्थापना करण्याची जबाबदारी स्वीकारली आणि ती पूर्णही झाली. त्यासाठी मुख्य न्यायधीश हिमा कोहली, आणि मुख्यमंत्री केसीआर यांनी प्रामुख्यानं जबाबदारी पार पाडली. केसीआर यांनी यापुढे जी काही साधनं, आर्थिक मदत लागेल ते पुरवण्याचं यावेळेस आश्वासन दिलं.

यावेळेस सरन्यायधीशांनी माजी पंतप्रधान नरसिंहराव यांचीही आठवण काढली. नरसिंहरावांच्याच काळात लवाद कायदा कसा अस्तित्वात आला हेही रामन्ना यांनी आवर्जून सांगितलं. मंत्री केटीआर यांनी ह्या लवाद केंद्रामुळे हैदराबादच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना व्यक्त केली. तर कंपन्यांनी ह्या केंद्रामुळे आता बाहेर देशात प्रवास करण्याची गरज पडणार नाही अशी आशा व्यक्त केलीय. (Chief Justice Ramana’s dream came true, now the center of international arbitration in Hyderabad)

तब्बल 65 दिवसांनी पत्नीला भेटल्यानंतर सूर्यकुमार खुश, VIDEO शेअर करत व्यक्त केला आनंद Video | कुत्र्यांवर महिलेचं भलतंच प्रेम, पण खेळताना मध्येच घोळ झाला, पाहा नेमकं काय घडलं ?

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.