India-China : चीनने भारतीय डॉक्टरचे केले अपहरण, जखमी सैनिकांवर करवून घेतले उपचार, मग केली डॉक्टरांची हत्या, दोन वर्षांनी उघड झाला धक्कादायक प्रकार
'इंडियाज मोस्ट फियरलेस ३- न्यू मिलिटरी स्टोरीज ऑफ अनइमॅजिनेबल केरज अँड सॅक्रिफाईस' असे या पुस्तकाचे नाव आहे. या डॉक्टरचे अपहरण केल्यानंतरही, या डॉक्टरने अनेक चिनी सैनिकांचे प्राण वाचवल्याचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर या डॉक्टरची चिनी सैन्याने निर्घृणरित्या हत्या केल्याचेही या पुस्तकात लिहिलेले आहे.
नवी दिल्ली – पूर्व लडाख परिसरात दोन वर्षांपूर्वी भारत आणि चिनी (India vs China)सैन्यात झालेल्या चकमकीच्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती हाती आली आहे. चीनने या चकमकीत सुरुवातीपासूनच त्यांचे किती सैनिक मारले गेले, ते लपवून ठेवले होते. आजही याचा योग्य आकडा जाहीर करण्यात आलेला नाही. दुसरीकडे भारतीय भारतीय सैनि्कांनाही चिनी सैनियाने अत्यंत क्रूरतेने वागवले होते. या चकमकीत जखमी झालेल्या चिनी सैनिकांवर उपचार करण्यासाठी एका भारतीय डॉक्टरचे (Indian doctor)अपहरण (Kidnapped)करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. या जखमी सैनि्कांवर उपचार केल्यानंतर या डॉक्टरची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकात ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
काय लिहिले आहे पुस्तकात?
शिव अरुर आणि राहुल सिंह या दोन पत्रकारांनी या घटनेबाबत पुस्तकात सविस्तरपणे लिहिलेले आहे. जून २०२० साली झालेल्या या घटनेची इत्थंभूत माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. ‘इंडियाज मोस्ट फियरलेस ३- न्यू मिलिटरी स्टोरीज ऑफ अनइमॅजिनेबल केरज अँड सॅक्रिफाईस’ असे या पुस्तकाचे नाव आहे. या डॉक्टरचे अपहरण केल्यानंतरही, या डॉक्टरने अनेक चिनी सैनिकांचे प्राण वाचवल्याचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर या डॉक्टरची चिनी सैन्याने निर्घृणरित्या हत्या केल्याचेही या पुस्तकात लिहिलेले आहे. १५ जानेवारी २०२० रोजी भारतीय सैन्यदल आणि चिनी सैन्यदलात चकमक झाली होती. त्यात एका कर्नलसह २० भारतीय जवानांचा मृत्यू झाला होता.
चिनी सैनिक मारले गेले, चीनने अमान्य केले
या झटापटीत अनेक चिनी सैनिकही मारले गेले होते. मात्र चिनी सैन्याने हे कबल करण्यात कुचराई केली. काही काळानंतर या चकमकीत चार चैसिनक मारले गेल्याचे चीनने मान्य केले. प्रत्यक्षात हा आकडा कितीतरी अधिक होता असे सांगण्यात येते. चीनने आपल्याला झालेले नुकसान लवण्यासाठी दुष्पचाराचा सहारा घेतल्याचा उल्लेखही या पुस्तकात करण्यात आला आहे.
डॉ. दीपक सिंह यांची अभूतपूर्व कामगिरी
या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, चीनने आपल्याच अनेक सैनिकांना जखमी अवस्थेत तसेच सोडले होते. त्यावेळी एक भारतीय डॉक्टर दीपक सिंह यांनी चिनी सैनिकांचे प्राण वाचवले होते. त्याचबरोबर अनेक भारतीय सैनिकांचे प्राणही त्यांनी वाचवले होते.
डॉ. दीपक सिंह वीर चक्राने सन्मानित
डॉक्टर दीपक सिंह यांना त्यांच्या बलिदानासाठी युद्धकाळातील दुसरा सर्वोच्च सन्मान वीर चक्राने सन्मानित करण्यात आले. तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते डॉ. दीपक सिंह यांच्या पत्नीला हा किताब देण्यात आला. मात्र डॉ. दीपक सिंह यांनी शत्रूंच्या सैनिकांचेही प्राण वाचवले होते, ही माहिती आत्ता प्रकाशात आली आहे. या पुस्तकात भारतीय सैन्यातील कर्नल रवीकांत यांच्या हवाल्याने डॉ. दीपक सिंह यांनी अनेक चिनी सैनिक आणि भारतीय सैनिकांचे प्राण वाचवल्याची माहिती देण्यात आलेली आहे.