AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke : विजयाचं अंतर फक्त 2 टक्के होतं आणि आता..ही सेटिंग नाहीतर काय आहे? अभिजीत दीपकेचा सवाल

Abhijeet Dipke : "हुकूमशाह नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमारला वाचवतायत. मागच्या 10-15 दिवसांपासून विद्यार्थी संघटना रस्त्यावर लढत आहेत. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं की, दिल्लीत मेट्रो बंद झाली, रेल्वे बंद झाली"

Abhijeet Dipke : विजयाचं अंतर फक्त 2 टक्के होतं आणि आता..ही सेटिंग नाहीतर काय आहे? अभिजीत दीपकेचा सवाल
CJP PC
| Updated on: Oct 15, 2026 | 3:43 PM
Share

“हुकूमशाह नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमारला वाचवतायत. मागच्या 10-15 दिवसांपासून विद्यार्थी संघटना रस्त्यावर लढत आहेत. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं की, दिल्लीत मेट्रो बंद झाली, रेल्वे बंद झाली. त्याने मन भरलं नाही म्हणून नक्षल प्रभावित भागातून फोर्सेस बोलावले” अशी टीका अभिजीत दीपके यांनी केली. “नरेंद्र मोदी सगळी दिल्ली ठप्प करतायत एका ज्ञानेशकुमारला वाचवण्यासाठी. इतकं सगळं करुन मन भरलं नाही, तेव्हा आपल्याच देशातल्या लोकांविरुद्ध युद्ध छेडलं ज्ञानेशकुमारसाठी. जंतर-मंतरवर सौरव आणि आशुतोष तिरंगा फडकवायला गेलेले. त्यांना तुरुंगात टाकलं” असं अभिजीत दीपके म्हणाले.

“दिल्लीला भारत-पाकिस्तान सीमा बनवून टाकली. विरोधी पक्षाला खेचलं. ज्ञानेशकुमार मोदींसाठी इतका महत्वाचा का आहे?. ज्ञानेशकुमार मोदींना काय लाच देतो?” असे प्रश्न अभिजीत दीपकेने विचारले आहेत. “जगदीप धनकड यांचा राजीनामा घेतला. उपराष्ट्रपतींना महत्व दिलं नाही. पंतप्रधान, राष्ट्रपतींना जे सुरक्षाकवच नाहीय ती इम्युनिटी ज्ञानेश कुमारला आहे” असं अभिजीत दीपके म्हणाले.” 2024 लोकसभेला इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये विजयाचं अंतर फक्त दोन टक्के होतं. 13 कोटी मतदार डिलिट केले. ही सेटिंग नाहीतर काय आहे?” असं अभिजीत दीपके म्हणाले.

‘नरेंद्र मोदी डरपोक आहेत’

“वन नेशन, वन इलेक्शन नाही तर वन नेशन, वन पार्टी ही खरी घोषणा आहे. नरेंद्र मोदी हुकूमशाह बनले आहेत. त्यांच्यात हिम्मत नाही. नरेंद्र मोदी परदेशात जातात तेव्हा मोदी गांधी, नेहरुच्या देशातून आलेत असच बोलतात. तेव्हा नेहरु, गांधी यांचं नाव घ्यावचं लागत” असं अभिजीत दीपके म्हणाले. “नरेंद्र मोदींना सांगायच आहे की, संपूर्ण देश तुमचा चेहरा बघतोय. नरेंद्र मोदी डरपोक आहेत. तिरंगा फडकवला म्हणून तुरुंगात टाकलं. इंग्रजांच्या काळात तिरंगा फडकावयाला परवानगी नव्हती. पोलीस तुरुंगात टाकायचे. नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार तुमच्यासाठी इतका महत्वाचा का आहे?. ज्ञानेश कुमार तुमच्यासाठी तिरंग्यापेक्षा महत्वाचा बनला आहे. तिरंगा आमचा अभिमान आहे, शान आहे” असं अभिजीत दीपके म्हणाले.

Follow Us
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...