VIDEO: Himachal Pradesh flood : धर्मशाळेत ढगफुटी, प्रलयकारी पुरात अनेक वाहनं वाहून गेली
हिमाचल प्रदेशची हिवाळी राजधानी धर्मशाळामधील भागसू नाग भागात आज (12 जुलै) सकाळी अचानक ढगफुटी झाली (Dharamshala Cloud Busted). त्यामुळे हाहाकार माजला.
धर्मशाळा : हिमाचल प्रदेशची हिवाळी राजधानी धर्मशाळामधील भागसू नाग भागात आज (12 जुलै) सकाळी अचानक ढगफुटी झाली (Dharamshala Cloud Busted). त्यामुळे हाहाकार माजला. ढगफुटीनंतर या भागात पुरस्थिती तयार झाली. यानंतर प्रशासनाने शहरी भागात हाय अलर्ट जारी केलाय. पुराचं पाणी शहरातील घरांमध्ये घुसलंय. त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. पुरात अनेक लग्जरी कार वाहून गेल्यात. धर्मशाळेच्या भागसू नाग भागातील ढगफुटी इतकी भयानक होती, की त्यानंतर लगेचच पूर आला (Flood In Dharamshala).
#WATCH Flash flood in Bhagsu Nag, Dharamshala due to heavy rainfall. #HimachalPradesh (Video credit: SHO Mcleodganj Vipin Chaudhary) pic.twitter.com/SaFjg1MTl4
— ANI (@ANI) July 12, 2021
पुरामुळे भागसू नाग भागातील छोटे नाले ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत. पाण्याची पातळी वाढल्यानं नाल्यांनी विक्राळ नदीचं रुप घेतलंय. या नाल्यांच्या कडेला असणारे हॉटेल (Hotel) आणि घरांना देखील पुराने मोठं नुकसान झालंय. एकाएकी तयार झालेल्या या परिस्थितीमुळे या ठिकाणी भीतीचं वातावरण तयार झालंय. या घटनेचा व्हिडीओ (Video Viral) देखील समोर आलाय. या व्हिडीओत पुराचा रौद्ररुप स्पष्टपणे पाहता येतंय. यात पुराच्या पाण्यात गाड्या वाहून जातानाही दिसत आहेत. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
#WATCH | Manjhi River rages after heavy rainfall near Dharamshala. #HimachalPradesh pic.twitter.com/SvXhs1kKMS
— ANI (@ANI) July 12, 2021
पुराने धर्मशाळेत हाहाकार माजवला, अनेक वाहनांना जलसमाधी
रविवारी (11 जुलै) रात्री उशिरापासून हिमाचल प्रदेशमधील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला, मात्र पुराने मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. मैदानी भागात या दिवसांमध्ये प्रचंड उकाडा असल्यानं अनेक लोक या काळात धर्मशाळाच्या भागसू नाग भागात थांबतात. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात गाड्या होत्या. पुराने या सर्व वाहनांचं मोठं नुकसान झालं.
हेही वाचा :
बुलडाण्यात ढगफुटीसदृश पाऊस, नदी-नाल्यांना पूर, धरणाच्या भिंतीवरून पाणी, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
मदतीऐवजी लोक मोबाईलवर व्हिडीओ काढण्यात मग्न, वृद्धाने पुराच्या पाण्यात जीव गमावला
Video: धोकादायक! झोपी गेले आणि पुरानं वेढले, एका एकाला दोरीनं काढले, पाहा व्हिडीओत काय काय घडले?
व्हिडीओ पाहा :
Cloud burst in Dharamshala Himachal Pradesh Heavy rain cause flood