याला म्हणतात, महाराष्ट्राची ‘ताकद’, NDA च्या बैठकीत एकनाथ शिंदे यांना महत्त्वाचं स्थान

'दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा', असं आपण अभिमानाने म्हणतो. "महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकला नाही आणि झुकणार नाही", असं वाक्य आपण नेहमी ऐकत आलो आहोत. दिल्लीच्या आजच्या NDAच्या बैठकीत आज असंच काहीसं बघायला मिळालं.

याला म्हणतात, महाराष्ट्राची 'ताकद', NDA च्या बैठकीत एकनाथ शिंदे यांना महत्त्वाचं स्थान
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 6:28 PM

नवी दिल्ली | 18 जुलै 2023 : ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’, असं आपण अभिमानाने म्हणतो. “महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकला नाही आणि झुकणार नाही”, असं वाक्य आपण नेहमी ऐकत आलो आहोत. विशेष म्हणजे आज देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत एक अनोखी गोष्ट बघायला मिळाली आहे. भाजपकडून आज दिल्लीत NDA ची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्रातून शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर पक्षांचे देखील नेते गेले आहेत. या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं बघायला मिळालं.

दिल्लीतील अशोका हॉटेल येथे एनडीएची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपते राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रांगेतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले आहेत. तर अमित शहा यांच्या बाजूला अजित पवार बसले आहेत. या बैठकीला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना महत्त्वाचं स्थान देण्याक आल्याचं चित्र आहे.

हे सुद्धा वाचा

‘महाराष्ट्रात 45 जागा निवडून आणणार’, मुख्यमंत्र्यांचं मोदींना आश्वासन

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या एकूण 45 जागा निवडून आणणार, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीत म्हणाले. तर लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही एकत्र असू, असं अजित पवार या बैठकीत म्हणाले. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. त्यापैकी 45 जागांवर विजय मिळवण्याचा मु्ख्यमंत्र्यांचा दावा आहे.

बैठकीचं 38 पक्षांना निमंत्रण

एनडीच्या बैठकीचं एकूण 38 पक्षांना निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यापैकी 24 पक्षांचा लोकसभेत एकही खासदार नाही. तर 7 पक्षांचे प्रत्येकी प्रत्येकी 1 खासदार आणि उर्वरित दोन पक्षांचे 2 खासदार बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत 2024च्या लोकसभा निवडणुकीबाबत रणनीती ठरवण्यात येत आहे.

या बैठकीला प्रत्येकाला बोलण्यासाठी आठ ते दहा मिनिटांचा वेळ देण्यात येत आहे. त्यामुळे भाजपचे मित्रपक्ष या बैठकीत काय भूमिका मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत निवडून येणं हे भाजपसाठी जास्त आव्हानचं ठरण्याची शक्यता आहे. कारण विरोधी पक्षाच्या गोटातदेखील जोरदार हालचाली सुरु आहेत. विरोधी पक्षांची आजच महत्त्वाची बैठक पार पडली आहे. त्यानंतर आता दिल्लीत एनडीची बैठक पार पडत आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.