भाजपच्या मुख्यमंत्र्याने घेतला INDIA चा धसका, ट्विटरवर बायोवरून INDIA काढून BHARAT लिहिलं

इंडिया आघाडी आणि एनडीए आघाडी दोघेही 2024च्या लोकसभा निवडणुकीत एकमेकांना पराभूत करण्यासाठी कंबर कसून उभे आहेत. कालच्या एनडीएच्या बैठकीला 39 पक्षांचे नेते होते.

भाजपच्या मुख्यमंत्र्याने घेतला INDIA चा धसका, ट्विटरवर बायोवरून INDIA काढून BHARAT लिहिलं
Himanta Biswa Sarma Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 19, 2023 | 12:07 PM

नवी दिल्ली | 19 जुलै 2023 : भाजपला 2024च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी मोट बांधली आहे. एकूण 26 पक्ष एकत्र आले आहेत. विरोधकांनी आपल्या नव्या आघाडीचं नाव INDIA असं ठेवलं आहे. तर भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीचं नाव एनडीएच राहणार आहे. त्यामुळे INDIA विरुद्ध NDA असा महामुकाबला 2024च्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. विरोधकांनी आपल्या आघाडीचं नाव INDIA ठेवल्यानंतर त्याचा सर्वात पहिला धसका भाजपच्या एका मुख्यमंत्र्यांनीच घेतला आहे. या मुख्यमंत्र्याने आपल्या ट्विटर बायोमधील INDIA हा शब्दच वगळला आहे. त्यामुळे या मुख्यमंत्र्यावर टीकेची झोड उठत आहे.

हे सुद्धा वाचा

विरोधकांनी आपल्या आघाडीचं नाव INDIA ठेवल्याने आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिस्वा सरमा यांनी त्यांच्या ट्विटर बायोवरून इंडिया हा शब्द हटवून त्याऐवजी भारत असं लिहिलं आहे. त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. मात्र, सरमा यांनी आपल्या कृतीचं समर्थनही केलं आहे. इंडिया भारत नाहीये. इंग्रजांनी आपल्या देशाचं नाव इंडिया ठेवलं आहे. आम्ही स्वत:ला वसाहतवाद्यांनी दिलेल्या गोष्टींपासून मुक्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपले पूर्वज भारतासाठी लढले. आपण भारतासाठी काम करत आहोत, असं मुख्यमंत्री हिंमत बिस्वा सरमा यांनी म्हटलं आहे. हिंमत बिस्वा सरमा यांनी त्यांच्या ट्विटर बायोवरून इंडिया हटवून भारत लिहिलं आहे. चीफ मिनिस्टर ऑफ आसाम, भारत असं त्यांनी लिहिलं आहे.

INDIA विरुद्ध BHARAT असा सामना रंगणार

आपल्या ट्विटर बायोमधून इंडिया काढून भारत लिहिणारे सरमा हे भाजपचे पहिलेच नेते आहेत. सरमा यांच्या या कृतीवर विरोधकांकडून टीका होत असतानाच विरोधकांनी आपल्या आघाडीचं नाव इंडिया ठेवल्याने त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांनीही जोरदार टीका केली आहे. विरोधकांनी केवळ नाव बदललं आहे. चेहरे तेच आहेत. इंडिया विरुद्ध तर भारतच लढेल, असं भाजपचे नेते सुशील कुमार मोदी म्हणाले. तर 2024च्या निवडणुकीत इंडिया विरुद्ध भारत मातेच्या दरम्यानच होईल, असं उपेंद्र कुशवाह म्हणाले.

काय आहे इंडियाचं फूल फॉर्म?

I-INDIAN (इंडियन) – भारतीय

N- NATIONAL (नेशनल) – राष्ट्रीय

D-DEMOCRATIC (डेमोक्रॅटिक) – लोकशाहीवादी

I-INCLUSIVE (इन्क्लूसिव्ह) – सर्व समावेशक

A- ALLIANCE (अलायन्स) – आघाडी

26 विरुद्ध 39

इंडिया आघाडी आणि एनडीए आघाडी दोघेही 2024च्या लोकसभा निवडणुकीत एकमेकांना पराभूत करण्यासाठी कंबर कसून उभे आहेत. कालच्या एनडीएच्या बैठकीला 39 पक्षांचे नेते होते. तर इंडियाच्या बैठकीला 26 पक्षाचे नेते होते. विशेष म्हणजे इंडियाच्या बैठकीला ज्या पक्षांचे नेते उपस्थित होते, ते नेते आणि त्यांचे पक्ष बलाढ्य राजकीय पक्ष म्हणून पाहिले जातात. तर एनडीएच्या बैठकीत सामील झालेले पक्ष अत्यंत छोटे आहेत. ज्यांचा एक खासदार निवडून येण्याची मारामार आहे, अशा पक्षांनाही एनडीएमध्ये सामील करून घेण्यात आलं आहे.

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.