AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीबीआयकडून मंत्री, आमदारांना अटक, ममतादीदी खवळल्या; म्हणाल्या, मलाही अटक करा

नारदा स्टिंग ऑपरेशन प्रकरणी सीबीआयने आज टीएमसीच्या मंत्री आणि आमदारांच्या घरी छापेमारी केली. (CM Mamata Banerjee challenges CBI to arrest her after detention of ministers Firhad Hakim)

सीबीआयकडून मंत्री, आमदारांना अटक, ममतादीदी खवळल्या; म्हणाल्या, मलाही अटक करा
Mamata Banerjee
| Updated on: May 17, 2021 | 11:57 AM
Share

कोलकाता: नारदा स्टिंग ऑपरेशन प्रकरणी सीबीआयने आज टीएमसीच्या मंत्री आणि आमदारांच्या घरी छापेमारी केली. त्यानंतर एका मंत्र्यासह दोन आमदार आणि एका नेत्याला अशा चौघा जणांना अटक केली. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी प्रचंड खवळल्या आहेत. आमच्या नेत्या आणि मंत्र्यांना बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली आहे. त्यामुळे हिंमत असेल तर मलाही अटक करा, असं आव्हानच ममता बॅनर्जी यांनी दिलं आहे. (CM Mamata Banerjee challenges CBI to arrest her after detention of ministers Firhad Hakim)

मंत्री, आमदारांच्या अटकेनंतर ममता बॅनर्जी यांनी थेट सीबीआयलाच आव्हान दिलं आहे. हिंमत असेल तर मलाही अटक करून दाखवा, असं आव्हानच ममता बॅनर्जी यांनी दिलं आहे. टीएमसीचे नेते आणि मंत्र्यांना बेकायदेशीरपणे अटक करण्यात आले आहे. त्यामुळे मलाही अटक करा, असं त्या म्हणाल्या आहेत. नेत्यांच्या अटकेनंतर ममता बॅनर्जी या सीबीआय कार्यालय असलेल्या निजाम पॅलेसमध्ये पोहोचल्या आहेत. गेल्या अर्ध्या तासापासून त्या निजाम पॅलेसमध्ये असून या परिसरात टीएमसी कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली आहे.

कोर्ट, विधानसभा अध्यक्षांची परवानगी नाही

मंत्र्यांना आणि नेत्यांना अटक करताना कोणत्याही नियमांचं पालन केलं नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी या निजाम पॅलेसमध्ये गेल्या असून 14व्या मजल्यावर सीबीआयशी चर्चा करत आहे. कोणत्या आधारावर नेत्यांना अटक करण्यात आली याचा जाब विचारण्यासाठी त्या इथे आल्या आहेत. कोर्टाची परवानगी न घेता आणि विधानसभा अध्यक्षांची परवानगी न घेता या नेत्यांना अटक करण्यात आल्याने त्यावरून ममता बॅनर्जी सीबीआय अधिकाऱ्यांना सवाल करत असल्याचं टीएमएसीचे नेते अनिंद राऊत यांनी म्हटलं आहे.

सकाळीच अटक

दरम्यान, आज सकाळी सीबीआयची एक टीम परिवहन मंत्री आणि कोलकाता पालिकेचे अध्यक्ष फिरहाद हकीम यांच्या घरी पोहोचली. त्यांच्या घरात छापेमारी केल्यानंतर त्यांना अटक करून सीबीआय आपल्यासोबत घेऊन गेली आहे. यावेळी हकीम यांनी मला नारदा घोटाळ्यात कोणत्याही नोटीशीशिवाय अटक केली जात असल्याचा दावा केला आहे. या घटनेची माहिती मिळताच टीएमसी कार्यकर्त्यांनी हकीम यांच्या घरासमोर गर्दी केली असून सीबीआय विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.

काय आहे नारदा घोटाळा?

पश्चिम बंगालमध्ये 2016च्या निवडणुकीपूर्वी नारदा स्टिंग टेप सार्वजनिक करण्यात आले होते. 2014मध्ये हे टेप रेकॉर्ड करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. यामध्ये टीएमसीचे मंत्री आणि आमदार एका काल्पनिक कंपनीकडून कॅश घेताना दिसत होते. हे स्टिंग ऑपरेशन नारदा न्यूज पोर्टलच्या मॅथ्यू सॅम्युअल यांनी केलं होतं. कोलकाता उच्च न्यायालयाने 2017मध्ये या स्टिंग ऑपरेशनची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या स्टिंग ऑपरेशनमध्ये या चार नेत्यांचीच नावे नव्हती, तर भाजपमध्ये सामिल झालेल्या अनेक नेत्यांचीही नावे होती. (CM Mamata Banerjee challenges CBI to arrest her after detention of ministers Firhad Hakim)

संबंधित बातम्या:

नारदा घोटाळा: पश्चिम बंगालमध्ये सीबीआयच्या धाडी; मंत्र्यासहीत चार टीएमसी नेत्यांना अटक

गोमूत्र प्यायल्याने फुफ्फुसाचं इन्फेक्शन होत नाही, मीही पिते, मला कोरोना झाला नाही: प्रज्ञासिंह ठाकूर

मोदीजी, आमच्या मुलांची व्हॅक्सिन परदेशात का पाठवली?, राहुल गांधी म्हणाले, मलाही अटक करा!

(CM Mamata Banerjee challenges CBI to arrest her after detention of ministers Firhad Hakim)

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.