मेहबुबा मुफ्ती यांच्याविरोधात दिल्लीत तक्रार, ‘ते’ ट्विट दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करणारे, वकिलाचा दावा
जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री तसेच पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मु्फ्ती यांच्याविरोधात दिल्लीमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरण तसेच लखीमपूर शेखी शेतकरी हत्याकांड या दोन मुद्द्यांवर ट्विट केले आहे.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री तसेच पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मु्फ्ती यांच्याविरोधात दिल्लीमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे ड्रग्ज प्रकरण तसेच लखीमपूर खेरी शेतकरी हत्याकांड या दोन मुद्द्यांवर ट्विट केले आहे. केवळ नावात खान असल्यामुळेच शाहरुख खानचा मुलगा आर्यनवर कारवाई केली जातेय, असा दावा मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे. त्यांच्या याच ट्विटवर आक्षेप नोंदवत दिल्लीतील एका वकिलाने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
मेहबुबा मुफ्ती यांच्या ट्विटमध्ये काय आहे ?
मेहबूबा मुफ्ती यांनी लखीमपूर खेरी शेतकरी मृत्यू तसेच क्रूझ रेव्ह ड्रग्ज प्रकरणावरून केंद्र सरकारला लक्ष्य केलं. “चार शेतकऱ्यांच्या हत्येच्या आरोपामध्ये मंत्र्याच्या मुलाला अटक करुन केंद्राने उदाहरण घालून दिले पाहिजे. मात्र, केंद्रीय तपास संस्था एका 23 वर्षाच्या मुलाच्या मागे लागल्या आहेत. त्याचे आडनाव फक्त खान असल्यामुळेच त्याच्यावर ही कारवाई केली जात आहे. न्याय या संकल्पनेचा उपहास करत भाजप आपल्या व्होटबँकेला खुश खरण्याचा प्रयत्न करत आहे. या मतदारांना खुश करण्यासाठीच मुस्लिमांना लक्ष्य करण्यात येत आहे,” असे मेहबुबा मुफ्ती यांनी आपल्या ट्विटरमध्ये म्हटलेलं आहे.
मुफ्ती यांचे वक्तव्य दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करणारे
याच ट्विटनंतर दिल्लीतील एका वकिलाने मुफ्ती यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. “भारतीय दंड संहितेनुसार मुफ्ती यांच्याविरोधात एफआरआय दाखल करण्यात यावं. त्यांनी दोन समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे,” असं विकालाने म्हटलं आहे. तसेच मुक्ती यांच्या वक्तव्यामुळे दोन समुदायांमध्ये वाद आणि तेढ निर्माण होऊ शकते, असा दावा या वकिलाने केला आहे.
आर्यनचा मुक्काम वाढला
दरम्यान, आर्यन खानचा जामीन कोर्टाने पुन्हा फेटाळला. त्यामुळे आर्यनचा मुक्काम आणखी दोन दिवस म्हणजेच बुधवार 13 ऑक्टोबरपर्यंत मुंबईतील आर्थर रोड जेलमध्येच असेल. आर्यन खानच्या वतीने अॅड. अमित देसाई यांनी जामिनावर बुधवारी सुनावणी घेण्याची मागणी केली. विशेष कोर्टात आर्यनच्या जामिनावर बुधवारी दुपारी 2.45 वाजता सुनावणी होईल.
मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर आता बुधवारी सुनावणी होणार आहे. आर्यनच्या जामीन अर्जावर उत्तर देण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) वेळ मागितला होता. मात्र, न्यायालयाने त्यांना बुधवारपर्यंतची मुदत दिली. क्रूझ ड्रग्ज छापेमारी प्रकरणी बोलताना, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) चे विभागीय संचालक समीर वानखेडे म्हणाले, “आम्ही आणि फिर्यादी प्रयत्न करू की प्रकरण तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल.
इतर बातम्या :
‘अशिक्षित लोक हे देशावरील ओझं’, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचं मोठं वक्तव्य
Lakhimpur Violence : लखीमपूर हिंसाचार प्रकरणात आशिष मिश्राला 3 दिवसांची पोलीस कोठडी
केवळ लग्नासाठी हिंदू करताहेत धर्मांतर, OTT पाहणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवा: मोहन भागवत
VIDEO : Special Report | माजी गृहमंत्री अनिल देशमुख आहेत कुठं?https://t.co/8ilQ7Y5TOw#AnilDeshmukh #Nagpur #Mumbai #CBI #ED
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2021
(complaint registered in delhi against Mehbooba Mufti for her tweet on lakhimpur kheri violence and aryan khan drug case)