अमित शाहांना कोरोना, आता जनतेला क्वारंटाईन करणारे पंतप्रधान मोदी स्वतः क्वारंटाईन होणार का? काँग्रेसचा सवाल
जनतेला क्वारंटाईन करणारे मोदी स्वतः क्वारंटाईन होणार का? असा सवाल युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास यांनी उपस्थित केला आहे (Congress ask PM Modi for self quarantine).
नवी दिल्ली : गृहमंत्री अमित शाह यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर आता अयोध्यामध्ये 5 ऑगस्टला होणाऱ्या राम मंदिर भूमिपूजनाला शाह उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही प्रश्न विचारला आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह दोघेही केंद्रीय मंत्रिमंडळच्या बैठकीत सोबत उपस्थित होते. आता जनतेला क्वारंटाईन करणारे मोदी स्वतः क्वारंटाईन होणार का? असा सवाल युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास यांनी उपस्थित केला आहे (Congress ask PM Modi for self quarantine). त्यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींना घेरलं आहे.
युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी क्वारंटाईन होणार की फक्त जनतेला क्वारंटाईन करणार असा सवाल केला आहे. श्रीनिवास म्हणाले, “बुधवारी (29 जुलै) झालेल्या कॅबिनेट बैठकीत गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान शेजारी बसले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला क्वारंटाईन करणार का? की नियम केवळ सामान्य नागरिकांसाठी आहेत?”
बुधवार को सम्पन्न कैबिनेट बैठक में गृह मंत्री श्री अमित शाह एवं प्रधानमंत्री अगल-बगल में मौजूद थे,
क्या प्रधानमंत्री भी अब सेल्फ क्वारन्टीन होंगे या नियम सिर्फ आम जनता के लिए है ?
— Srinivas B V (@srinivasiyc) August 2, 2020
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
श्रीनिवास यांनी आपल्या इतर काही ट्विटमध्ये कोरोना नियंत्रणात सरकार अपयशी ठरल्याचाही आरोप केला आहे. आतापर्यंत देशातील 18 लाख नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आता गृहमंत्री अमित शाह यांना आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा. मात्र, कोरोनाचा 21 दिवसात नायनाट करणार म्हटले ते 21 दिवस कधी संपणार आहेत? असा प्रश्न श्रीनिवास यांनी उपस्थित केला.
++ Karnataka CM BS Yediyurappa ..
I wish him speedy recovery. https://t.co/FqbqxHP6ca
— Srinivas B V (@srinivasiyc) August 2, 2020
आतापर्यंत गृहमंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल, मंत्री, डॉक्टर, पोलिसांसह 18 लाख भारतीयांना कोरोना संसर्ग झाला. त्यामुळे देशात सरकार अस्तित्वात आहे की सर्वकाही आत्मनिर्भर आहे? असा प्रश्न उपस्थित करत श्रीनिवास यांनी मोदी सरकारला घेरलं.
चिनी कंपन्यांच्या जाहिराती घेणाऱ्या बीसीसीचे चेअरमन जय शाह देशद्रोही नाहीत का?
अब चीनी APP नही ‘Made in China’ सरकार को BAN करने का समय आ गया है..!
BCCI का सेकेट्री कौन है ? https://t.co/XKQjMKkzA7
— Srinivas B V (@srinivasiyc) August 2, 2020
श्रीनिवास यांनी आपल्या अन्य एका ट्विटमध्ये अमित शाह यांचे सुपुत्र आणि बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शाह यांच्यावरही निशाणा साधला. आयपीएलमध्ये चिनी कंपन्यांच्या जाहिरातीला मंजुरी देण्यात आली आहे. बीसीसीआयचे सेक्रेटरी कोण आहेत? चिनी अॅपवरील बंदीनंतर आता मेड इन चायना सरकारवर बंदी घालण्याची वेळ आली आहे.
हेही वाचा :
Amit Shah Corona | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण
Congress ask PM Modi for self quarantine