26 पक्ष, कर्नाटकात खलबतं, ‘इंडिया’ आघाडीचं देशात नेतृत्व कोण करणार? खर्गे म्हणाले….

देशातील 26 विरोधी पक्षांची आज कर्नाटकात बैठक पार पडली. या बैठकीनंतर एक संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी या बैठकीत नेमके काय-काय निर्णय घेण्यात आले, याबाबत थोडक्यात माहिती देण्यात आली.

26 पक्ष, कर्नाटकात खलबतं, 'इंडिया' आघाडीचं देशात नेतृत्व कोण करणार? खर्गे म्हणाले....
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 5:12 PM

बंगळुरु | 18 जुलै 2023 : देशभरातील आज तब्बल 26 विरोधी पक्षांची आज कर्नाटकच्या बंगळुरु येथे बैठक पार पडली. या बैठकीत भाजप विरोधात लढणाऱ्या या नव्या आघाडीचं नाव ठरवण्यात आलं. या आघाडीला ‘इंडिया’ असं नाव देण्यात आलं आहे. देशभरातील 26 विरोधी पक्षांच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडल्यानंतर त्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या पत्रकार परिषदेत बोलायला सुरुवात केली. त्यांनी यावेळी या नव्या आघाडीचं इंडिया असं नाव ठेवल्याचं जाहीर केलं. यावेळी त्यांनी इंडियाचा अर्थ देखील सांगितला. I म्हणजे इंडियन, N म्हणजे नॅशनल, D म्हणजे डेमोक्रेटिक, I म्हणजे इन्कुसिव्ह, A म्हणजे अलायन्स, असं खर्गे म्हणाले. विशेष म्हणजे यावेळी खर्गे यांनी भाजपवर सडकून टीका केली.

मल्लिकार्जुन खर्गे काय-काय म्हणाले?

“भाजपला देशाची लोकशाही आणि संविधान संपवायचं आहे. ते केंद्रीय तपास यंत्रणांचा यासाठी वापर करत आहेत. विरोधकांना दाबण्यासाठी ते ईडी, सीबीआय सारख्या तपास यंत्रणांचा वापर करत आहेत”, अशी टीका मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. “आपल्यासाठी देश हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. आपल्याला देशाला कसं वाचवता येईल यासाठी प्रयत्न लकरणं हेच आमचं ध्येय आहे. विरोधकांच्या बैठकीची पुढची बैठक ही मुंबईत होईल”, असं खर्गे यांनी जाहीर केलं.

यावेळी इंडिया आघाडीचं नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर “विरोधकांच्या समन्वयासाठी 11 संयोजक बनवण्यात येणार आहेत. मुंबईच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येणार. इंडिया आघाडीचं नेतृत्व कोण करणार याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. ही फार काही मोठी गोष्ट नाही”, असं मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितलं.

“याआधी पाटण्याला बैठक झाली. त्यावेळी 16 पक्ष बैठकीत होते. पण आज 26 पक्ष एकत्र आले आहेत. नरेंद्र मोदी यांनी 30 पक्षांची एनडीए बैठक बोलावली आहे. पण मला माहिती नाही एवढे 30 पक्ष कोणते आहेत. ते रजिस्टर आहेत का? मला माहिती नाही. त्यांच्या एनडीएतून अनेक पक्ष सोडून जात आहेत. त्यांच्या एनडीएचे तुकडे झाले आहेत. आता निवडणुकीच्या आधी मोदी ते तुकडे जोडण्याचे प्रयत्न करत आहेत”, असं खर्गे म्हणाले.

“आमचं ध्येय हे प्रत्येक महत्त्वाचे विषय एकामागेएक घेण्याचं आहे. आम्ही आपापसातले सर्व मतभेद दूर सारुन लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. आम्ही आगामी निवडणुकीला एकत्रितपणे सामोरं जाणार आहोत. मी सर्वांचे आभार मानतो”, असं खर्गे म्हणाले.

ममता बॅनर्जी काय-काय म्हणाल्या?

“आजची बैठक खूप चांगली ठरली. भाजपला आजपासून नवं आव्हान सुरु झालं आहे. आमच्या 26 पक्षांच्या बैठकीत चांगली चर्चा झाली. ज्यांचं आयुष्य धोक्यात आहे, मग ते देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यात असेल, सरकार विकणं हेच काम या सरकारचं आहे. आपल्याला खर्गे यांनी डिटेल्स दिले आहेत. पण त्याचा शॉर्ट फॉर्म इंडिया आहे. भाजपा तुम्ही इंडियाला चॅलेंज द्याल? आम्ही आमच्या मातृभूमीवर प्रेम करतो. आम्ही शेतकरी, दलित, चांगल्या अर्थव्यवस्थेसाठी काम करत आहोत”, असं पश्चिम बंगालच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी म्हणाल्या.

“इंडियाला वाचवायचं आहे. भाजप देश विकण्याचा सौदा करत आहे. लोकशाहीला खरेदी करण्याचा सौदा करत आहे. त्यासाठी कोणत्याही यंत्रणेला स्वतंत्रपणे काम करु देत नाहीत. जो पक्ष विरोधी पक्षाला पाठिंबा देतो त्याला ईडी, सीबीआयचा धाक दाखवला जातो. इंडिया जिंकेल तर देश जिंकेल”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

अरविंद केजरीवाल काय-काय म्हणाले?

“ही दुसरी बैठक आहे. पाटण्याला 16 पक्ष होते. आज 26 आहेत. नऊ वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांना देशाच्या जनतेने संधी दिली होती. पण या नऊ वर्षात त्यांनी एकाही सेक्टरला बरबाद करण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही. रेल्वे बरबाद झालीय. सर्व विमानतळ, जहाज विकले. पृथ्वी, आकाश सर्व विकून टाकलं. देशात आज प्रत्येक व्यक्ती दु:खी आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण स्वत:साठी एकत्र झालेलो नाहीत. तर देशाला आम्हाला वाचवायचा आहे. प्रत्येकाला रोजगार मिळायला हवं. योग्य उपचार मिळावे. आज खूप चांगली चर्चा झाली”, अशी प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.

उद्धव ठाकरे काय-काय म्हणाले?

“दुसरी यशस्वी बैठक आमची पार पडली आहे. तानाशाहीच्या विरोधात जनता एकत्र होत आहे. भारतासाठी आम्ही लढत आहोत. अनेकांनी मला प्रश्न विचारले, वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत. पण यालाच लोकशाही म्हणतात. ही लढाई कुटुंबासाठी नाही. पण देश हाच आमचं कुटुंब आहे. आमची लढाई ही नीतीच्या विरोधात आहे. स्वातंत्र धोक्यात आलं आहे. आम्हाला विश्वास आहे की, आम्ही यशस्वी होईल. देशाच्या जनतेला आम्ही विश्वास देऊ इच्छितो की, आम्ही आहोत. तुम्ही घाबरु नका. एक व्यक्ती किंवा एक पक्ष म्हणून देश म्हणता येणार नाही. देशाची प्रत्येक व्यक्ती मिळून देश आहे. पुढची बैठक ही महाराष्ट्रातील मुंबईत आयोजित करु”, अशी माहिती ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.

राहुल गांधी काय-काय म्हणाले?

“ही आमची दुसरी बैठक आहे. आज खूप चांगलं काम झालं. खूप सामंजस्याने काम झालं. भाजपची विचारधाराविरोधात ही लढाई आहे. ते देशावर आक्रमण करत आहेत. बेरोजगारी वाढत आहे. देशाचं धन फक्त मोजक्या लोकांकडे जात आहे. त्यामुळे आम्ही चर्चा करत असताना स्वत:ला विचारला की ही लढाई कोणाच्या विरोधात आहे? तर ही लढाई विरोधक आणि सत्ताधाऱ्यांविरोधात नाही. देशाच्या आवाजासाठी ही लढाई आहे. त्यामुळेच इंडिया या नावाची निवड करण्यात आली आहे. लढाई ही नरेंद्र मोदी आणि इंजियाच्या विरोधात आहे. त्यांची विचारधारा आणि इंडियाच्या विरोधात आहे. यानंतर आमची बैठक महाराष्ट्रात होणार. आता आम्ही निर्णय घेतला आहे की, आम्ही एक अॅक्शन प्लॅन तयार करणार ज्याने आम्ही देशात जे करणार आहोत त्याबद्दल बोलू”, असं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.