Congress: काँग्रेससाठी ऐतिहासिक दिवस; ते ‘स्पेशल 23’ इतिहास घडवणार की विजनवासात जाणार?

काँग्रेसच्या 23 नेत्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षातील संघटनात्मक बदलांची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आज हे नेते सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. (congress interim president Sonia Gandhi to meet dissenters today)

Congress: काँग्रेससाठी ऐतिहासिक दिवस; ते 'स्पेशल 23' इतिहास घडवणार की विजनवासात जाणार?
Sonia Gandhi
Follow us
| Updated on: Dec 19, 2020 | 8:55 AM

नवी दिल्ली: काँग्रेसच्या 23 नेत्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षातील संघटनात्मक बदलांची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आज हे नेते सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. सोनिया गांधी यांच्या घरीच होणाऱ्या या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह पक्षातील काही मोजकेच नेते उपस्थित राहणार आहेत. पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले परंतु या पत्रावर सह्या न केलेले नेतेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे हे 23 नेते पक्षांतर्गत बदल करण्यास पक्षनेतृत्वाला भाग पाडतात की पक्षनेतृत्वालाच आव्हान दिलं म्हणून विजनवासात जाणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. (congress interim president Sonia Gandhi to meet dissenters today)

काँग्रेसचे मार्गदर्शक नेते, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि अहमद पटेल यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी पक्षातील नाराजांशी चर्चा करणार आहे. त्यामुळे या नेत्यांची त्या कशी समजूत काढतात आणि पक्ष संघटन वाढवण्यासाठी काय निर्णय घेतात याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे. काँग्रेसच्या संघटनात्मक फेरबदलांविषयी पत्र लिहिणाऱ्या या 23 नेत्यांची सोनिया गांधीसोबत बैठक घडवून आणण्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी मोठी भूमिका बजवाली आहे. कमलनाथ यांनी काही दिवसांपूर्वी सोनिया गांधींची भेट घेऊन याच मुद्द्यांवर चर्चा केल्याचं बोललं जात आहे.

नाराजी दूर होणार?

या बैठकीला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, ज्येष्ठ काँग्रेस नेते ए. के. अँटनी, पी. चिदंबरम, गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, शशी थरूर, भूपिंदरसिंग हुड्डा, के. सी. वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, हरीश रावत यांच्यासह राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोतही या बैठकीत सहभागी होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. पक्षातील नाराजी दूर करण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची असल्याचं मानलं जात आहे.

काँग्रेसमध्ये आता जोरबैठका वाढणार?

या बैठकीपूर्वीच काल शुक्रवारी काँग्रेसने पक्षाचं नेतृत्व स्वीकारण्यास राहुल गांधी हेच योग्य असल्याचं म्हटलं होतं. पक्षाचे सर्व नेते काँग्रेस कुटुंबाचे घटक आहेत. सोनिया गांधी यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत पक्ष संघटनेसह देशातील इतर मुद्द्यांवरही चर्चा होणार असल्याचं पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं होतं. कोरोना संकटामुळे सोनिया गांधी पक्षातील अनेक नेत्यांशी चर्चा करू शकल्या नव्हत्या. त्यामुळे येणाऱ्या काळात अनेक नेत्यांशी भेटून विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याचा निर्णय सोनिया गांधी यांनी घेतला आहे. काँग्रेसचा प्रत्येक नेता आमच्यासाठी महत्त्वाचा असून आम्ही सर्वजण मिळून येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना करणार आहोत, असं सुरजेवाला यांनी स्पष्ट केलं होतं. यावरून आगामी काळात काँग्रेसमध्ये बैठकांचे सत्र पार पडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

काँग्रेसच्या 99.99 टक्के नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना राहुल गांधींनीच पक्षाचे नेतृत्व स्वीकारावे असे वाटत आहे. राहुल गांधी हेच निर्भयपणे मोदींना टक्कर देऊ शकतात. राहुल गांधी यांनी संपूर्ण देश पिंजून काढलेला आहे. त्यामुळे पक्षासाठी त्यांचं नेतृत्वच योग्य असल्याचंही कार्यकर्त्यांना वाटत असल्याचं सुरजेवाला यांनी सांगितलं.

दरम्यान, ऑगस्टमध्ये काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा आणि कपिल सिब्बल सहीत काँग्रेसच्या 23 नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिलं होतं. यावेळी या नेत्यांनी सोनिया यांना पक्षाचे सक्रिय अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती करतानाच पक्षात संघटनात्मक बदल करण्याची मागणीही केली होती. काँग्रेसच्या या प्रमुख नेत्यांनी पत्राद्वारे गांधी कुटुंबालाचा आव्हान दिल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे अनेक नेत्यांनी आझाद यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली होती. त्यानंतर बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. त्यावरही आझाद आणि सिब्बल यांनी उघडपणे टीका केली होती. तसेच पक्षात व्यापक बदल घडवून आणण्याची मागणीही केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांवर पक्षातूनच टीकेची झोड उठली होती.

निवडणुकीतील खराब कामगिरीवर चर्चा

आजच्या बैठकीत बिहार विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरी तसेच 11 राज्यातील विधानसभेच्या 58 जागांवरील पोटनिवडणुकीतील निकालावर सोनिया गांधी चर्चा करण्याची शक्यता आहे. या शिवाय राजस्थान महापालिकेतील खराब कामगिरीसह इतर राज्यातील निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीवरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (congress interim president Sonia Gandhi to meet dissenters today)

संबंधित बातम्या:

महाआघाडी सरकारमध्ये ऑल इज नॉट वेल? ठाकरे सरकारविरोधात काँग्रेसची चक्क दिल्लीत प्रेस कॉन्फरन्स?

सोनियांचं उद्धव ठाकरेंना पत्र, पण काय आहे त्यात? वाचा महाराष्ट्र प्रभारी काय सांगतायत?

पुत्र मोह सोडा, लोकशाही वाचवा; सोनिया गांधींना ‘या’ नेत्याने दिला सल्ला

(congress interim president Sonia Gandhi to meet dissenters today)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.