Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi | सर्वात मोठी बातमी! खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांचं पहिलं ट्विट, आक्रमकपणे म्हणाले….

राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर अवघ्या दोन वाक्यात भूमिका मांडली आहे.  पण हे दोन वाक्य अतिशय मोठी आणि महत्त्वाची आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता आगामी काळात भाजप आणि काँग्रेस यांच्यातील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Rahul Gandhi | सर्वात मोठी बातमी! खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांचं पहिलं ट्विट, आक्रमकपणे म्हणाले....
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 5:53 PM

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासरदारकी रद्द करण्यात आल्यानंतर विरोधकांकडून मोदी सरकारवर सडकून टीका करण्यात येतेय. विशेष म्हणजे या कारवाईवर राहुल गांधी यांची नेमकी भूमिका काय असेल? असा प्रश्न अनेकांचा पडलेला. अखेर राहुल गांधी यांनी या प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर अवघ्या दोन वाक्यात भूमिका मांडली आहे.  पण हे दोन वाक्य अतिशय मोठी आणि महत्त्वाची आहेत.

“मी भारताच्या आवाजासाठी लढत आहे. त्यासाठी मी कोणतीही किंमत चुकवायला तयार आहे”, असं मोठं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर आगामी काळात काँग्रेस आणि भाजप यांच्यातील संघर्ष आगामी काळात आणखी जास्त तीव्र होण्याची चिन्हं आहेत. देशभरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. देशभरात ठिकठिकाणी काँग्रेसकडून आंदोलन पुकारण्यात आलं आहे.

राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आंदोलन करुन या निर्णयाचा विरोध करण्यात येतोय. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर अतिशय कडक शब्दांत यावर टीका केली आहे.

“चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे आहेत आणि राहूल गांधी यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाहीचं हे सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे.. फक्त लढाईला दिशा द्यावी लागेल, यासाठी आम्ही काँग्रेससोबत आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

‘लोकशाहीचा गळा घोटला’

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयावर महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार चंद्रपूरचे बाळू धानोरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारतातील लोकशाही घातक वळणावर पोहोचली असून राहुल गांधी यांना घाबरून आणि त्यांची लोकप्रियता लक्षात घेता हा निर्णय मुद्दाम घेतल्याचे खासदार धानोरकर म्हणाले. राहुल गांधी यांनी 150 दिवस भारतभर भ्रमण करत जनतेचे प्रश्न समजून घेतले होते. त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. अदानी यांचे मोदीशी असलेले संबंध लक्षात घेता त्याविषयी राहुल गांधी यांनी लोकसभेत सविस्तर मुद्दे मांडले होते. मात्र भाजपने हा निर्णय घेत लोकशाहीचा गळा घोटल्याचे खासदार धानोरकर म्हणाले.