स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी रांगाच रांगा, हे फोटो मोदी सरकारला आयुष्यभर छळतील; सुरजेवालांची खोचक टीका

देशात कोरोनाचा हाहाकार उडाला आहे. रोज हजारो लोक कोरोनाने मृत्यूमुखी पडत आहेत. (congress leader Randeep Singh Surjewala hits modi government over corona death)

स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी रांगाच रांगा, हे फोटो मोदी सरकारला आयुष्यभर छळतील; सुरजेवालांची खोचक टीका
Randeep Singh Surjewala
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 1:08 PM

नवी दिल्ली: देशात कोरोनाचा हाहाकार उडाला आहे. रोज हजारो लोक कोरोनाने मृत्यूमुखी पडत आहेत. त्यामुळे स्मशनाभूमीतही मृतदेह जाळण्यासाठी रांगाच रांगा लागल्या आहेत. त्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी केंद्र सरकावर जोरदार निशाणा साधला आहे. (congress leader Randeep Singh Surjewala hits modi government over corona death)

रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. हे मानवतेच्या विरोधात आहे. हा गुन्हा आहे. अंत्यसंस्कारासाठी लागलेल्या या रांगा अंहकारी शासक दगडाच्या काळजाचे असल्याचा हा पुरावा आहे, असं ट्विट सुरजेवाला यांनी केलं आहे. आपल्याच जनतेचे मृत्यू होत आहेत. अशा घटनांमुळे कोणतेही सरकार मजबूत होऊ शकत नाही. या घटना आणि फोटो मोदी सरकारचा आयुष्यभर पिच्छा पुरवतील, अशी टीका ही त्यांनी केली आहे.

आंधळ्या सिस्टिमला सत्य दाखवा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करून लोकांनी एकमेकांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. या आंधळ्या सिस्टिमला सत्य दाखवलं पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे. एकमेकांना मदत करताना सामान्य लोक दिसत आहेत. यातून कोणाचं मन जिंकण्यासाठी हाताला स्पर्श करण्याची गरज नसल्याचं दिसून येतं. मदतीचा हात असाच देत राहा आणि या आंधळ्या सिस्टिमला सत्य दाखवत राहा, असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे.

पहिल्यांदाच 3 हजारांवर मृत्यू

दरम्यान, गेल्या चोवीस तासात भारतात 3 हजार 293 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाने एकाच दिवशी 3 हजार रुग्णांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 3,60,960 नवे रुग्ण सापडले आहेत.

कोणत्या राज्यात किती रुग्ण?

महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे 66,358 नवे रुग्ण सापडले असून कोरोनामुळे 895 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात चोवीस तासात 32,993 नवे रुग्ण सापडले आहेत. केरळमध्ये 32,819, कर्नाटकात 31,830 आणि राजधानी दिल्लीत कोरोनाचे 24,149 नवे रुग्ण सापडले आहेत. दिल्लीत गेल्या चोवीस तासात 381 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 29,78,709 झाली आहे. देशात आतापर्यंत 14.78 कोटी कोरोना लसीकरण करण्यात आलं आहे. तसेच आजपासून 18-45 दरम्यानच्या नागरिकांच्या लसीकरणासाठी आजपासून नोंदणी केली जात आहे. 18 वर्षांवरील लोकांना येत्या 1 मे पासून लस देण्यात येणार आहे. (congress leader Randeep Singh Surjewala hits modi government over corona death)

संबंधित बातम्या:

18 वर्षावरील व्यक्तींसाठी लस नोंदणी सुरु, रजिस्ट्रेशन केल्याशिवाय नंबर येणार नाही, एका क्लिकवर सर्व माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुलती नर्मदाबेन मोदी यांचं कोरोनाने निधन

थयथयाट केल्याने मेलेले परत येणार नाहीत, आम्ही काहीच करू शकत नाही; हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचं धक्कादायक विधान

(congress leader Randeep Singh Surjewala hits modi government over corona death)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.