काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित; पाच राज्यांतील पराभवावर काय म्हणाल्या सोनिया गांधी?

काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. (Congress postpones president elections for 3rd time)

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित; पाच राज्यांतील पराभवावर काय म्हणाल्या सोनिया गांधी?
sonia gandhi
Follow us
| Updated on: May 10, 2021 | 3:17 PM

नवी दिल्ली: काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिली आहे. तसेच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवावरही त्यांनी चिंता व्यक्त करताना या पराभवातून धडा घ्या, असं आवाहन सोनिया गांधी यांनी केलं आहे. (Congress postpones president elections for 3rd time)

काँग्रेस कार्यकारी समितीची आज बैठक पार पडली. या ऑनलाईन बैठकीला संबोधताना सोनिया गांधी यांनी हे आवाहन केलं. आपण 22 जानेवारीला भेटलो होतो. तेव्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक जूनमध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. निडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांनी निवडणुकीचा कार्यक्रम तयार केला आहे. मात्र, कोरोनाचं संकट वाढल्याने पक्षाध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे, असं सोनिया गांधी यांनी सांगितलं.

बंगालमध्ये एकही जागा न मिळणं आश्चर्य

यावेळी त्यांनी पाच राज्यांतील निवडणुकांमधील काँग्रेसच्या पराभवावरही भाष्य केलं. या पराभवातून काँग्रेसने धडा घेण्याची गरज आहे. असे निकाल का आले? हे जाणून घेतलं पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये आपल्याला एकही जागा मिळाली नाही हे आश्चर्यजनक आहे. या धक्कादायक निकालांची दखल घेतलीच पाहिजे. या निकालांची समीक्षा करण्यासाठी छोटी छोटी टीम तयार करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल आल्यावर पुढील दिशा ठरवता येईल, असं त्या म्हणाल्या.

इतका वाईट पराभव का झाला?

या निकालाने मी निराश आहे, असं जर मी म्हटलं तर एकप्रकारे वस्तुस्थिती झाकून ठेवल्याचाच तो प्रकार होईल. आपला इतका वाईट पराभव का झाला हे समजून घेतलं पाहिजे. या प्रश्नांतून काही न पटणारे उत्तरे येतील. परंतु त्यातून आपण धडा घेतला पाहिजे. आपण सत्य परिस्थितीला सामोरे गेलो नाही किंवा तथ्यांना योग्य प्रकारे पाहिले नाही तर आपण कधीच धडा घेणार नाही. आसाममधील पराभवाची माहिती जितेंद्र सिंह, पश्चिम बंगालची माहिती जितिन प्रसाद, पुद्दुचेरी आणि तामिळनाडूची माहिती दिनेश गुंडुराव आणि केरळची माहिती तारिक अन्वर देतील, असं सोनिया गांधींनी स्पष्ट केलं.

कोरोना रोखण्यात सरकार अपयशी

यावेळी त्यांनी कोरोनावरून केंद्र सरकारवर टीका केली. कोरोनाचं संकट रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. मात्र, देशातील प्रत्येक नागरिकाचं लसीकरण झालं पाहिजे. या संकटाच्या काळात काँग्रेस जनतेच्या सोबत आहे. आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे देशाची आरोग्य व्यवस्था अजून मजबूत करण्याची गरज आहे, असंही त्या म्हणाल्या. (Congress postpones president elections for 3rd time)

संबंधित बातम्या:

शरद पवारांचे कट्टर विरोधक, बारामतीचे माजी खासदार संभाजीराव काकडे यांचं निधन

मराठा आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; विनायक मेटेंची मागणी

Maharashtra Coronavirus LIVE Update : नाशकात 12 तारखेपासून शहरात दहा दिवस शहरात राहणार कडक टाळेबंदी

(Congress postpones president elections for 3rd time)

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.