काँग्रेसचा एल्गार; 15 जानेवारीला देशभरातील राजभवनांना घेराव घालणार
गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यात केंद्र सरकारला अपयश आलं आहे. (Congress to protest outside all Governor Houses on Jan 15)
नवी दिल्ली: गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यात केंद्र सरकारला अपयश आलं आहे. उलट शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे. त्याचा निषेध म्हणून येत्या 15 जानेवारी रोजी शेतकरी अधिकार दिनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस देशभरातील राजभवनांना घेराव घालणार आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी आज पत्रकार परिषदेत या आंदोलनाची घोषणा केली. (Congress to protest outside all Governor Houses on Jan 15)
रणदीप सुरजेवाला यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. देशाच्या गेल्या 73 वर्षाच्या इतिहासात इतकं निष्ठूर आणि निर्दयी सरकार पाहिलं नाही. हे सरकार इंग्रज आणि ईस्ट इंडिया कंपनीपेक्षाही निष्ठूर आहे, अशी टीका करतानाच आता शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्यासाठी देशातील शेतकरी करो या मरोचं आंदोलनही करतील, असं सुरजेवाला यांनी सांगितलं.
मोदींना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही
संविधानाने कायदे बनिवण्याची आणि रद्द करण्याची जबाबदारी संसदेवर सोपवली आहे. कोर्टावर नाही. पण हे सरकार शेतकऱ्यांना कोर्टात जाण्यास सांगत आहे. मोदी सरकारला आपली जबाबदारी पेलता येत नाही. त्यामुळे त्यांना सत्तेत राहण्याचा काहीही अधिकार नाही, असा घणाघाती हल्लाही त्यांनी चढवला.
गेल्या 40 दिवसांपासून हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर काळे कायदे रद्द व्हावेत म्हणून ठाण मांडून बसले आहेत. थंडी आणि पावसाचा मारा झेलत हे शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनात आतापर्यंत 60 हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या या 60 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी पंतप्रधानांच्या तोंडून चकार शब्दही निघालेला नाही, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांचं ऐकावंच लागेल
15 जानेवारीला सरकार शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी जेव्हा चर्चा करेल तेव्हा त्यांना देशाचं पूर्ण वातावरण बदलेलं दिसून येईल. त्यामुळे सरकारला शेतकऱ्यांचं ऐकावंच लागेल. जेव्हा अंहकाराची परिसीमा होते, नागरिकांच्या अधिकारांची पायमल्ली केली जाते, तेव्हा विरोधक आणि देशातील नागरिकांनी अशा अहंकारी सरकारविरोधात रस्त्यावर उतरायचं असतं. ते त्यांचं कर्तव्य असतं, असंही ते म्हणाले. (Congress to protest outside all Governor Houses on Jan 15)
असं असेल आंदोलन
शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी 15 जानेवारी रोजी प्रत्येक राज्यातील मुख्यालयातून शेतकरी अधिकार दिनाच्या निमित्त जनआंदोलन करण्यात येईल. धरणे धरण्यात येतील. त्यानंतर रॅली काढून राजभवनापर्यंत मार्च काढला जाईल. तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यासाठी ही राजभवनाला घेराव घालण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. (Congress to protest outside all Governor Houses on Jan 15)
15 जनवरी को देश भर में ‘किसान अधिकार दिवस’ – होगा ‘राजभवन’ का घेराव
भारत की पहली सरकार, जो जिम्मेदारी से पीछा छुड़ा किसान को कह रही – ‘सुप्रीम कोर्ट चले जाओ’ – ऐसी मोदी सरकार गद्दी छोड़ घर चली जाए, तो अच्छा
न किसान थकने वाला, न झुकने वाला और न रुकने वाला
हमारा बयान-: pic.twitter.com/g1MxdlMI9o
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) January 9, 2021
संबंधित बातम्या:
सार्वजनिक उपक्रमांचं वेगाने खासगीकरण करा; मोदींना अर्थतज्ज्ञांचा सल्ला
कृषी कायदे रद्द होणार नाहीच, इतर पर्याय असतील तर द्या; केंद्र सरकार भूमिकेवर ठाम
तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची… थंडी-पावसाचा मारा झेलत दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच
(Congress to protest outside all Governor Houses on Jan 15)