काँग्रेसचीही ‘सोशल मीडिया वॉरियर्स टीम’ची घोषणा; केंद्रातील मोदी सरकारला टक्कर देणार?
भाजपशी दोन हात करण्यासाठी काँग्रेस सज्ज झाली आहे. (Congress to recruit 5 lakh 'social media warriors' to counter BJP IT cell)
नवी दिल्ली: भाजपशी दोन हात करण्यासाठी काँग्रेस सज्ज झाली आहे. त्यामुळे काँग्रेसने आता सोशल मीडिया वॉरियर्स टीम तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तशी घोषणाच केली आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये आगामी काळात सोशल वॉर पाहायला मिळणार आहे. (Congress to recruit 5 lakh ‘social media warriors’ to counter BJP IT cell)
राहुल गांधी यांनी या सोशल मीडिया वॉरियर्स टीमची ट्विटरवरून घोषणा केली आहे. ही सोशल मीडिया वॉरियर्स टीम सत्य आणि न्यायासाठी काम करेल. ही टीम न्यायासाठी लढणाऱ्या योद्ध्यांची आहे. ही द्वेषाची सेना नसेल. हिंसा पसरवणारी फौज नसेल. ही सत्याची सेना आहे. ही सेना भारताच्या विचाराचं संरक्षण करेल, असं राहुल यांनी म्हटलं आहे. ज्यांना या सोशल मीडिया वॉरियर्स टीममध्ये सहभागी व्हायचे आहे, त्यांच्यासाठी फ्री टोलनंबर जारी करण्यात आला आहे. या टीममध्ये व्हॉट्सअॅप, वेबसाईट आणि ईमेलद्वारेही सहभागी होता येणार आहे.
5 लाख सोशल मीडिया वॉरियर्स तयार करणार
आज पक्षाचे वरिष्ठ नेते पवनकुमार बंसल, प्रवक्ते पवन खेडा आणि पार्टी सोशल मीडिया विभाग प्रमुख रोहन गुप्ता यांनी या अभियानाची सुरुवात केली आहे. देशातील प्रत्येक शहरात 5 लाख सोशल मीडिया वॉरियर्स बनविण्याचं आमचं लक्ष्य आहे. या सोशल वॉरियर्सच्या माध्यमातून देशाच्या समोरील प्रश्न देशातील जनतेसमोर मांडण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या योद्ध्यांच्या माध्यमातून विचार आणि सिद्धांतांवर चर्चा करण्यात येणार आहे, असं बंसल यांनी सांगितलं.
महिनाभर अभियान राबवणार
यावेळी रोहन गुप्ता यांनी केंद्रातील मोदी सरकारव टीका केली. लोकशाही संस्थांची गळचेपी करण्यात येत आहे. सरकारविरोधात आवाज उठविणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. त्यामुळे या संकटाचा सामना करणं ही आमची जबाबदारी आहे, असं गुप्ता म्हणाले. आम्ही स्वस्थ बसू शकत नाही. देशातील जनतेचा आवाज बुलंद करणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळेच आम्ही हे अभियान सुरू करत आहोत. हे अभियान एक महिनाभर चालविण्यात येणार आहे. त्यात देशभरातील लोक जोडले जातील, असंही त्यांनी सांगितलं. (Congress to recruit 5 lakh ‘social media warriors’ to counter BJP IT cell)
India needs non violent warriors to fight for truth, compassion & harmony. You are central to defending the idea of India.
Come, #JoinCongressSocialMedia in this fight.
India needs you! pic.twitter.com/DhBsHMKU22
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 8, 2021
संबंधित बातम्या:
Fact Check | मिया खलिफाच्या पोस्टरला काँग्रेस कार्यकर्ते केक भरवतानाचा फोटो व्हायरल, खरं काय?
खासगी शाळांना फीवरुन विद्यार्थ्यांना शाळेतून काढता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
VIDEO: शांत रहाणं म्हणजे अन्याय करणाऱ्याला साथ देणं, नसीरुद्दीन शाह यांची मोदी सरकारवर टीका
(Congress to recruit 5 lakh ‘social media warriors’ to counter BJP IT cell)