भारतात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ, नवीन वर्षातही कोरोनाचा धोका कायम
Corona Update : देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. थंडीत कोणत्याही आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग देखील वाढला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांनी आरोग्य विभाग ही सतर्क झाला आहे. नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.
Corona Update : नवीन वर्षात देखील कोरोनाचं संकट कायम आहे. कारण कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढतच चालली आहे. भारतात कोरोनाचे 636 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. देशात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 4,394 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत केरळमध्ये दोन आणि तामिळनाडूमध्ये एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढला
गेल्या वर्षी दररोज वाढत असलेल्या रुग्णांची संख्या दुहेरी आकड्यात होती. पण आता थंडीमुळे संसर्ग वाढू लागला आहे. नवीन व्हेरिएंटमुळे रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली आहेत. अमेरिका आणि मलेशियामध्ये या व्हेरिएंटने कहर केला आहे. हा व्हेरिएंट आता महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये दाखल झाला आहे. कोरोनामुळे गेल्या चार वर्षात 4.5 कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 5.3 लाखांहून अधिक लोकांनी कोरोनामुळे आपली जीव गमवली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेले 4.4 कोटींहून अधिक लोकं बरी झाली आहेत. देशाता कोरोनातून बरे होण्याचा दर 98.81 टक्के आहे. देशात 220.67 कोटी डोस लोकांना देण्यात आले आहेत.
नव्या व्हेरिएंटचा कहर
कोविड-19 सब-व्हेरियंट JN.1 मुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ पाहता केंद्र सरकार देखील अलर्ट झाले आहे. आरोग्य विभागाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
भारतात 28 डिसेंबरपर्यंत JN.1 चे एकूण 145 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) JN.1 ला स्वारस्य प्रकार आणि त्याच्या मूळ वंशाहून वेगळे म्हणून वर्गीकृत केले, BA.2.86. WHO ने माहिती दिली आहे की सध्याच्या पुराव्याच्या आधारे, JN.1 द्वारे उद्भवलेला एकंदर धोका कमी आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आजारी व्यक्तींना गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याच्या सूचना ही देण्यात आल्या आहेत. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आरोग्य विभागाने टेस्टिंग वाढण्याच्या सूचनाही राज्यांना दिल्या आहेत.