कोरोनामुळे अंडरवर्ल्डचंही ‘एन्काऊंटर’; अनेक गँगस्टर, कुविख्यात कैद्यांची टरकली

कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वसामान्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. इतकेच नाही तर अंडरवर्ल्डमध्येही कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. (corona terror in underworld, many gangster tested positive)

कोरोनामुळे अंडरवर्ल्डचंही 'एन्काऊंटर'; अनेक गँगस्टर, कुविख्यात कैद्यांची टरकली
chota rajan
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 3:44 PM

नवी दिल्ली: कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वसामान्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. इतकेच नाही तर अंडरवर्ल्डमध्येही कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. अनेक गँगस्टरांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर काही जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे आपल्या दहशतीने अनेकांना ढगात पोहोचवणारे गँगस्टर या अदृश्य संसर्गामुळे अंडरग्राऊंड झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. (corona terror in underworld, many gangster tested positive)

बिहारचे माजी खासदार आणि डॉन मोहम्मद शाहबुद्दीन यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्यावर दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. उपचार सुरू असतानाच शनिवारी रात्री त्यांचं निधन झालं. विशेष म्हणजे शाहबुद्दीन यांच्या मृत्यूच्या तीन दिवस आधीच कोर्टाने त्यांचा चांगला उपचार करण्याचे निर्देश दिले होते.ॉ छोटा राजनलाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल व्हावे लागलं आहे. त्याच्यावर दिल्लीच्या एम्समध्ये उपचार सुरू आहेत. छोटा राजनला इतरही अनेक व्याधी आहेत. त्यातच आता त्याला कोरोना झाल्याने त्याच्या आरोग्याला अधिक धोका असल्याचं सांगितलं जातं.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या पुतण्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जीलाही कोरोना झाला आहे. या शिवाय दाऊदलाही कोरोना झाला आहे. दाऊच्या पत्नीलाही कोरोना झाला आहे. दोघेही कराचीत आर्मी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दाऊचा पर्सनल स्टाफ आणि सुरक्षारक्षकही क्वॉरंटाईन असल्याचं सांगितलं जातं.

दाऊदचं कुटुंब कोरोनाच्या विळख्यात

दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमने हे वृत्त फेटाळून लावलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दाऊदचा पुतण्या सिराज कास्करचा कराचीत मृत्यू झाला. कोरोनामुळे दाऊदचे इतर नातेवाईकही आजारी आहेत. मुंबईतील तुरुंगात असलेले दाऊदच्या इतर साथीदारांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

तुरुंगातच उपचार

पंजाबच्या रोपड तुरुंगात उपचार घेत असलेल्या बाहुबली मुख्तार अन्सारीलाही कोरोना झाला आहे. त्यामुळे त्याला बॅरेक नंबर 16मध्ये आयसोलेट करण्यात आलं आहे. यावेळी त्याच्यावर तुरुंगातच उपचार सुरू आहे. मात्र, त्याची ब्लड शुगर वाढल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्याची मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान, बांदा जेलमध्ये येण्यापूर्वी त्याची कोरोना टेस्ट झाली होती. तो बॅरेकमध्ये एकटा असतानाही त्याला कोरोना कसा झाला? याचं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

या कैद्यांनाही कोरोना

सीतापूर जेलमध्ये सपा खासदार आजम खान आणि त्यांच्या आमदार मुलाला कोरोना झाला आहे. तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेला विद्यार्थी नेता उमर खालिद यांनाही कोरोना झाला आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बाबा राम रहीम आणि आसाराम बापूही तिहारमध्ये आहेत. दोघांनाही कोरोनाची लागण झालेली नाही. मात्र, कोरोनाच्या भीतीच्या छायेत दोघेही वावरत आहेत. कोरोनाची प्रचंड भीती वाटत असल्याने पॅरोलवर सोडण्यासाठी आसारामने तुरुंगातच उपोषण सुरू केल्याचंही बोललं जात आहे. दुसरीकडे रोहतक तुरुंगातील रॉकस्टार बाबानेही कोरोनाचा संसर्ग वाढल्याने पॅरोलवर सोडण्याची मागणी केली आहे. (corona terror in underworld, many gangster tested positive)

संबंधित बातम्या:

Kolhapur Lockdown | कोल्हापुरात कोरोना रुग्णसंख्या वाढती, पुढील 10 दिवस कडकडीत लॉकडाऊन

हैदराबादेतील प्राणी संग्रहालयात 8 सिंहांना कोरोनाची लागण, भारतातील पहिलंच प्रकरण!

‘तुम्ही आंधळे बनू शकता, आम्ही नाही’, दिल्लीतील ऑक्सिजनच्या तुटवड्यावर उच्च न्यायालयाने केंद्राला फटकारलं

(corona terror in underworld, many gangster tested positive)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.