…आता 12 वर्षांवरील मुलांना मिळणार कोरोनाची लस, वृद्धांनाही मिळणार बुस्टर डोस; सरकारचा मोठा निर्णय

लहान मुलं सुरक्षित तर देश सुरक्षित राहणार. त्यांनी त्यापुढे लिहिले आहे की, 16 मार्च पासून कोविड लसिकरणाला पुन्हा प्रारंभ करत आहोत, आणि त्यामध्ये 60 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना आम्ही बूस्टर डोस देणार आहोत.

...आता 12 वर्षांवरील मुलांना मिळणार कोरोनाची लस, वृद्धांनाही मिळणार बुस्टर डोस; सरकारचा मोठा निर्णय
प्रातिनिधिक छायाचित्र.Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 3:58 PM

मुंबईः कोरोना व्हायरसपासून (Corona Virus) वाचण्यासाठी आता एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 16 मार्च पासून 12 ते 14 वयोगटातील बालकांना व्हॅक्सिन (Vaccine) देण्यात येणार आहे. 12 ते 14 वयोगटातील बालकांना आता Corbevax व्हॅक्सिन दिले जाणार आहे. Corbevax हे Biological E Limited या कंपनीने तयार केले आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी आता अनेक उपाय करण्यात येत असले तरी आता एक चांगली गोष्ट समोर आली आहे.16 मार्च पासून 12 ते 14 वयोगटातील बालकांना व्हॅक्सिन देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Union Health Minister) यांनी दिली आहे.

बालकांसाठी हा निर्णय घेतल्यानंतर आता ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 60 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना आता बूस्टर डोस देण्यात आला आहे. या आधी भारतात फक्त आरोग्य विभागाचे कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्स आणि ज्या नागरिकांच वय 60 वर्षापेक्षा अधिक आहे आणि ज्यांना comorbidity आहे, त्यांनाच फक्त बूस्टर डोस देण्यात येत होता.

मुलं सुरक्षित तर देश सुरक्षित

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करुन सांगितले आहे की,लहान मुलं सुरक्षित तर देश सुरक्षित राहणार. त्यांनी त्यापुढे लिहिले आहे की, 16 मार्च पासून कोविड लसिकरणाला पुन्हा प्रारंभ करत आहोत, आणि त्यामध्ये 60 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना आम्ही बूस्टर डोस देणार आहोत. त्यामुळे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांनाही लस घेण्याचे आवाहन केले आहे.

लहान मुलांसाठी व्हॅक्सिनला सुरुवात

भारतात 3 जानेवारीपासून लहान मुलांसाठी व्हॅक्सिनला सुरुवात करण्यात आली होती, पहिल्या टप्प्यात 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी व्हॅक्सिन देण्यात येत आहे. तर आता 12 ते 14 वयोगटातील बालकांना व्हॅक्सिन सुरु करण्यात आले आहे.

नागरिकांना व्हॅक्सिन डोस

भारतात सध्या कोरोनाची परिस्थिती भयावह नसली तरी मागील 24 तासात 2503 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 4377 नागरिक चांगले झाले आहेत. तर 27 नागरिकांचा या काळात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या कोरोना झालेल्या रुग्णांची संख्या ही 36, 168 इतकी झाली असून 675 दिवसांतील ही रुग्णसंख्या सर्वात कमी आहे. तर गेल्या 680 दिवसातील कोरोनाच्या केसही कमी झाल्या आहेत. देशातील 1 कोटी 80 नागरिकांना व्हॅक्सिन डोस देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

मराठी माणसांची मनसे पुन्हा दिसली पाहिजे, राज ठाकरेंच्या सूचना; हिंदुत्वावरही जोर

अनिल देशमुखांना दिलासा नाहीच! जामीन अर्ज कोर्टाने नाकारला, अडचणी आणखी वाढणार?

साखर कारखाने विक्री, अनियमितता आणि अण्णा हजारेंची तक्रार, विधानसभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतलं, ते प्रकरण नेमकं काय?

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.