कोरोना लसीकरणात अमेरिकेला मागे टाकत भारताने गाठला नवा मैलाचा टप्पा!
उपलब्ध अहवालानुसार आज सकाळी 7 वाजेपर्यंत 43 लाख 21 हजार 898 सत्रांमध्ये, एकूण 32 कोटी 36 लाख 63 हजार 297 लसी देण्यात आल्या आहेत. तर गेल्या 24 तासात 17 लाख 21 हजार 268 लसी देण्यात आल्या आहेत.
मुंबई : कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणात एकूण लसी देण्यासंदर्भात अमेरिकेला मागे टाकत भारताने नवा मैलाचा टप्पा गाठला आहे. भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण अभियानाची सुरुवात 16 जानेवारी 2021 रोजी तर अमेरिकेत लसीकरण अभियानाला 14 डिसेंबर 2020 रोजी सुरुवात झाली होती. भारताच्या देशव्यापी लसीकरण अभियानाने काल 32.36 कोटींचा मैलाचा टप्पा पार केला. उपलब्ध अहवालानुसार आज सकाळी 7 वाजेपर्यंत 43 लाख 21 हजार 898 सत्रांमध्ये, एकूण 32 कोटी 36 लाख 63 हजार 297 लसी देण्यात आल्या आहेत. तर गेल्या 24 तासात 17 लाख 21 हजार 268 लसी देण्यात आल्या आहेत. (India overtakes America in Corona vaccination)
कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 रोजी सुरुवात झाली आहे. देशभरात लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केन्द्र सरकार वचनबद्ध आहे. भारतात गेल्या 24 तासात 46 हजार 148 नव्या रुग्णांची नोंद झाली. सलग 21 दिवस 1 लाखापेक्षा कमी दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांच्या सातत्यपूर्ण आणि समन्वित प्रयत्नांचे हे फळ आहे. भारतात सक्रीय रुग्णसंखेतही सातत्याने घट होत आहे. देशात आज सक्रीय रुग्णसंख्या 5 लाख 72 हजार 994 इतकी आहे.
#COVID19 लसीकरणात अमेरिकेला मागे टाकत भारताने गाठला नवा मैलाचा टप्पा
भारताच्या कोविड19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला 32.36 कोटींचा टप्पा
गेल्या 24 तासात 46,148 नव्या रुग्णांची नोंद
भारतातील सक्रीय रुग्णसंख्येत घट होऊन ती 5,72,994 वर#Unite2FightCorona ?https://t.co/xjMVWNvg2N pic.twitter.com/CTg4MSmfkE
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) June 28, 2021
गेल्या 24 तासात 58 हजार 578 रुग्ण बरे
गेल्या 24 तासात सक्रीय रुग्णसंख्येत एकूण 13 हजार 409 इतकी घट झाली असून सध्या देशात केवळ 1.89 टक्के सक्रीय रुग्ण आहेत. कोविड -19 संसर्गातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण बरे होत आहे. त्यामुळे सलग 46 व्या दिवशी भारतात नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गेल्या 24 तासात 58 हजार 578 रुग्ण बरे झाले. दैनंदिन नव्या रुग्णांच्या तुलनेत गेल्या 24 तासात जवळपास, 12 हजार (12,430) रुग्ण बरे झाले.
साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दरातील घट कायम
भारतात महामारीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत एकूण 2 कोटी 93 लाख 09 हजार 607 तर गेल्या 24 तासात 58 हजार 578 रुग्ण कोविड-19 संसर्गातून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा कल सातत्याने सकारात्मक असून आता रुग्ण बरे होण्याचा एकूण दर 96.80 टक्के झाला आहे. चाचण्यांच्याही क्षमतेत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात 15 लाख 70 हजार 515 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकूण 40.63 कोटींपेक्षा अधिक (40,63,71,279) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशात एकीकडे चाचण्या वाढत असून दुसरीकडे साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दरातील घट कायम आहे. सध्या साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर 2.8 टक्के तर दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 2.94 टक्के आहे. सलग 21 व्या दिवशी हा 5 टक्के पेक्षा कमी आहे.
सरकारी बँकांच्या खासगीकरणासाठी जोरदार हालचाली; केंद्र सरकारची उच्चस्तरीय बैठक https://t.co/pNinvnpicg #Banks #Privatiazation #ModiGovt
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 28, 2021
संबंधित बातम्या :
‘जनतेतील अस्वस्थता दडपण्यासाठी राज्य सरकारकडून कोरोनाच्या नावाखाली सामाजिक आणीबाणी’, भाजपचा घणाघात
India overtakes America in Corona vaccination