Pakistan ने कोरोना लस मागितली तर भारत देणार का? परराष्ट्र मंत्रालयाने केलं स्पष्ट

भारताने आतापर्यंत भूतान, मालदीव, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार आणि सेशल्स इथं कोरोना लस पाठवली असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं.

Pakistan ने कोरोना लस मागितली तर भारत देणार का? परराष्ट्र मंत्रालयाने केलं स्पष्ट
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 2:58 PM

नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्रालयाने (Foreign Ministry) शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, भारत (India) सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, मोरोक्को, बांगलादेश आणि म्यानमार या देशांना करारानुसार कोरोना लस (Corona Virus Vaccines) पुरवत आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषद घेत यासंबंधी माहिती दिली. भारताने आतापर्यंत भूतान, मालदीव, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार आणि सेशल्स इथं कोरोना लस पाठवली असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. (corona vaccines news Foreign Ministry said that pakistan not yet orders commercial supplies india corona vaccines)

भारत पाकिस्तानलाही कोरोना लस पाठवणार आहे का? असा प्रश्न विचारला असता श्रीवास्तव हे म्हटले की, शासन स्तरावर किंवा व्यावसायिक तत्वावर लसींचा पुरवठा करण्यासाठी पाकिस्तानकडून मागणी आल्याची कोणतीही माहिती नाही. पाकिस्तानकडून लस मागितल्यास त्यावर भारताची काय भूमिका असणार यावर उत्तर देणं त्यांनी टाळलं.

भारताने ‘या’ देशांनी दिली कोरोनाची लस

शुक्रवारी ब्राझील आणि मोरोक्को इथं कोरोनाची लस पाठवण्यात आली आहे. याआधीही बुधवारी भारताने कोव्हिशिल्ड लसीचे 1.5 लाख डोस भूतानला आणि एक लाख डोस मालदीवला पाठवले होते. गुरुवारी भारताने कोव्हिशील्ड लसीच्या 20 लाख डोस बांगलादेशला आणि 10 लाख डोस नेपाळला मदत म्हणून पाठवले. कोरोनासारख्या जीवघेण्या संसर्गात भारताची सगळ्या देशांना मदत करणं एक कौतूकाची बाब आहे. यामुळे अनेक देशांनी भारताचे आभारही मानले आहेत.

इतकंच नाही तर शुक्रवारी भारताने म्यानमारला 15 लाख कोरोनाचे डोस आणि सेशेल्सला 50 हजार डोस पाठवले. श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत गरजा लक्षात घेऊन भारत येत्या आठवड्यात आणि महिन्याभरात आपल्या भागीदारी असलेल्या देशांना कोरोनाच्या लसांचा टप्प्याटप्प्याने पुरवठा करणार आहे. यासगळ्यात भारतात लसीची कमतरता भासू नये याचीही काळजी घेतली जात आहे. इतर देशांना लसींचा पुरवठा करत असताना आपल्याकडे पुरेसा साठ आहे याची खात्री नेहमी केली जात असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, नियामक मान्यता मिळाल्यानंतर श्रीलंका आणि अफगाणिस्तानात मदत म्हणून लसीचा पुरवठा केला जाईल असंही प्रवक्त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. कोरोनाच्या या जीवघेण्या संसर्गाला कायमचं संपवण्यासाठी भारतानेही सगळ्या देशांना मदत पुरवली आहे. देशाच्या या मोलाच्या योगदानामुळे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैयर बोल्सनारो यांनी भारताचं कौतूक केलं आहे. फक्त कौतूक नाही तर त्यांनी थेट हनुमान देवाला संजीवनी नेतानाचा फोटोही यावेळी त्यांनी ट्विट करत भारताचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही त्यांनी आभार मानले आहेत.

ब्राझीलचे अध्यक्ष जैयर एम बोल्सनारो (Jair M Bolsonaro) यांनी यासंबंधी शुक्रवारी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, ‘नमस्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदी. या साथीच्या काळात तुमच्यासारखा चांगल्या साथीदार मिळाल्यामुळे ब्राझीलला हा सन्मान वाटत आहे. कोरोना लस भारतातून ब्राझीलमध्ये आणल्याबद्दल धन्यवाद. ” असं त्यांनी ट्विटमध्ये लिहलं आहे. इककंच नाही तर त्यांनी हिंदीमध्ये धन्यवाद असंही लिहलं आहे. (corona vaccines news Foreign Ministry said that pakistan not yet orders commercial supplies india corona vaccines)

संबंधित बातम्या – 

ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष म्हणतात, थँक्यू इंडिया, तेही संजीवनी घेऊन आलेल्या हनुमानाच्या फोटोसह, वाचा सविस्तर

Serum Institute Fire : धक्कादायक! सीरमच्या इमारतीला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू

कोव्हॅक्सीन लसीविषयी धास्ती; जे.जे. रुग्णालयात दिवसभरात 100 पैकी केवळ 13 जण लसीकरणास हजर

Corona Vaccine : कोरोना लसीच्या साईड इफेक्ट्सची भीती वाटतेय? जाणून घ्या लस निर्मिती कंपन्यांच्या महत्वाच्या सूचना

(corona vaccines news Foreign Ministry said that pakistan not yet orders commercial supplies india corona vaccines)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.