कोरोना नंतर आता XBB चा धोका; अमेरिके नंतर भारतातही रुग्ण आढळले; महाराष्ट्रातील ‘या’ शहरातही आहेत रुग्ण…

ब्रिटन, अमेरिका आणि सिंगापूरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असून चीनमधील अनेक शहरांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन सुरू झाले आहे.

कोरोना नंतर आता XBB चा धोका; अमेरिके नंतर भारतातही रुग्ण आढळले; महाराष्ट्रातील 'या' शहरातही आहेत रुग्ण...
Follow us
| Updated on: Oct 21, 2022 | 8:28 PM

नवी दिल्लीः देशासह अनेक राष्ट्रातून आता कोरोनामुळे (Corona) पुन्हा नागरिकांच्या मनात भीती पसरू लागली आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटमधील दुसऱ्या या प्रकारामुळे लोकांची चिंता वाढली आहे. आता ओमिक्रॉनचा (Omicron) आणखी एक सब-व्हेरियंट XBB आता संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे भारतातच नव्हे, तर जगातील अनेक देशांमध्ये या लाटेचा धोका वाढला असल्याचे सांगण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनीही XBB मुळे जगातील अनेक देशांमध्ये नवी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

XBB हे Omicron च्या BJ.1 आणि BA.2.75 च्या उप-वंशांपासून तयार झाले आहे. याला रीकॉम्बिनंट प्रकार म्हणतात. तर दुसरीकडे, XBB.1 हा XBB चा उप-वंश असल्याचेही सांगण्यात आले आहे.

ब्रिटन, अमेरिका आणि सिंगापूरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असून चीनमधील अनेक शहरांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन सुरू झाले आहे.

एक्सबीबीमुळेही कोरोनाच्या वाढीचे कारण असल्याचेही सांगण्यात येत आहे. XBB आणि XBB.1 सिंगापूर, बांग्लादेश, युरोप आणि उत्तर अमेरिकेत याचे रुग्ण आढळले असून XBB भारतातही दाखल झाल्याचे सांगितले आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत XBB प्रकाराची लागण झालेल्या 18 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी पुण्यात 13 रुग्ण आढळले आहेत. तसेच पुण्याबरोबरच नागपूर आणि ठाण्यात 2-2 तर अकोल्यात एक रुग्ण आढळून आला आहे.

या XBB व्यतिरिक्त एका रुग्णाला BQ.1 आणि एक BA.2.3.20 चीदेखील लागण झाली आहे. 24 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान हे रुग्ण आढळून आले आहेत. त्या 20 पैकी 15 जणांनी कोरोनाची लसही घेतली होती, त्यामुळेच ही चिंता व्यक्त केली जात आहे.

ओमिक्रॉनचे सब-व्हेरियंट XBB सादर केल्यामुळे पुन्हा नव्या लाटेचा धोका वाढला आहे. WHO चे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनीही याबाबत भीती व्यक्त केली आहे.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.