Corona Vaccine : कोरोनाची लस 94.5 टक्के परिणामकारक, मॉडर्नाचा दावा

या सगळ्यात अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी मोडर्नाने कोरोनाव्हायरस विरूद्ध तयार केलेली लस ही आजारापासून बचाव करण्यासाठी 94.5 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे.

Corona Vaccine : कोरोनाची लस 94.5 टक्के परिणामकारक, मॉडर्नाचा दावा
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 9:05 AM

नवी दिल्ली : भारतासह जगभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) चा जीवघेणा संसर्ग वाढत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात (India) कोरोना रूग्णांची संख्या 88 दशलक्ष पेक्षा जास्त आहे. यामुळे या संसर्गावर लस शोधण्याचं कामही मोठ्या जोरात सुरू आहे. या सगळ्यात अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी मोडर्नाने कोरोनाव्हायरस विरूद्ध तयार केलेली लस ही आजारापासून बचाव करण्यासाठी 94.5 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे. (coronavirus covid 19 vaccine moderna calmed vaccine is 94 percent effective)

मॅसेच्युसेट्स आधारित मॉडर्नना यांनी फिझर आणि बायोनटेक यांच्या घोषणेनंतर एका आठवड्यातच यासंबंधी घोषणा केली आहे. त्यांच्याद्वारे विकसित केलेली लस ही 90 टक्क्यांपर्यंत प्रभावी असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.

मोडर्नाने निवेदनात म्हटलं आहे की, ‘एमआरएनए-1273 असं लसीचं नाव असू याची तिसऱ्या टप्प्यात चाचणी करण्यात आली आहे. मॉडर्नाने 95 स्वयंसेवकांवर या लशीचा प्रयोग केला होता. जगातल्या ज्या मोजक्या लशींच्या प्रयोगाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय त्यात मार्डनाचा समावेश आहे.

दरम्यान, लस (Vaccine) उत्पादक कंपनी भारत बायोटेकने (Bharat Biotech) सोमवारी कोव्हिड – 19 संसर्गावर मात करणाऱ्या भारतातील पहिल्या देशी लसीची म्हणजेच ‘कोव्हॅक्सिन’ची (covaxin) तिसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू केली असल्याची घोषणा केली. फेज-3 चाचणीमध्ये संपूर्ण भारतातील 26,000 स्वयंसेवकांचा समावेश असणार आहे. याचं संचालन हे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या संयुक्त विद्यमानं सुरू आहे.

हैदराबादमध्ये स्थित कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, लससाठी हा भारताचा पहिला फेज-3 कार्यक्षमता अभ्यास असून आतापर्यंतचा सर्वात मोठा फेज-3 किती प्रभावी आहे याचं परीक्षण यामध्ये होणार आहे. चाचणीत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना 28 दिवसात दोन इंट्रामस्क्युलर इंजेक्शन दिले जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. सहभागींना कोवाक्सिन किंवा प्लेसबो दिलं जाईल. ही चाचणी दुहेरी अंध असणार आहे. म्हणजेच अन्वेषक, सहभागी आणि कंपनीला कोणत्या ग्रुपची लस दिली गेली आहे हे कळणार नाही.

इतर बातम्या –

केवळ लसीच्या बळावर कोरोनावर मात करणं शक्य नाही!, जागतिक आरोग्य संघटनेचा दावा

देशातली पहिली कोरोना लस ‘कोव्हॅक्सिन’ची तिसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू, 26 हजार स्वयंसेवकांचा समावेश

(coronavirus covid 19 vaccine moderna calmed vaccine is 94 percent effective)

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.