Covid 19 : सेलिब्रेशन करा पण जरा सांभाळून, आरोग्य विभागाचा सल्ला
कोरोनाने पुन्हा एकदा चिंता वाढवल्या आहेत. कारण पुन्हा एकदा कोरोनाचे संसर्ग वाढू लागले आहे. अमेरिका आणि सिंगापूरमध्ये आढलेला कोरोनाचा नवा विषाणू आता भारतात ही सापडला आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे. आरोग्य विभागाने सेलिब्रेशन करताना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. आरोग्य विभागाने अलर्ट जारी केला आहे. नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने होणाऱ्या सेलिब्रेशनदरम्यान संसर्गाचे प्रमाण वाढण्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. आरोग्य विभागाने लोकांना कोविड -19 च्या प्रतिबंधाशी संबंधित प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.
कोरोनाचा हा नवीन प्रकार धोकादायक नसून त्याचा संसर्ग टाळण्याची गरज आहे. लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि सामाजिक अंतर राखणे आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे यासारख्या COVID-19 संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे देखील आरोग्य मंत्रालयाने सल्ला दिला आहे.
सुरक्षिततेसाठी खबरदारी घेणे आवश्यक
सीएमओ म्हणाले की, व्हायरसच्या नवीन प्रकाराला घाबरण्याची गरज नाही. सुरक्षिततेसाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. सहसा खोकला आणि सर्दी झाल्यास लोक स्वतः औषध विक्रेत्याकडून औषधे विकत घेतात, जे योग्य नाही. खोकला, सर्दी किंवा फ्लू सारखी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच औषध घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.
ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करताना काळजी घ्या
नाताळ आणि नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान कोविड-19 संबंधित मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे आहे, यामुळे संसर्गाचा प्रसार रोखण्यास मदत होईल. मधुमेह, टीबी, कर्करोग, दमा किंवा इतर कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे. इन्फ्लूएंझा सारखे आजार आणि गंभीर श्वसन संक्रमणाच्या प्रकरणांमध्ये सर्व रूग्णांची RTPCR चाचणी करण्यास सांगितले आहे आणि संसर्गाची पुष्टी झाल्यास, नमुन्यांची जीनोम अनुक्रमणिका करण्याचे आदेश दिले आहेत.
खोकला, सर्दी, तापची समस्या
रुग्णालयात अनेकांना ताप, सर्दी सारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. खोकला, सर्दी, ताप इत्यादींनी त्रस्त रूग्णांच्या विशेष चाचणीचे आदेश दिले आहेत.