मोठी बातमी ! कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ? राहुल गांधीसोबत गुप्त बैठका सुरु

कन्हैया कुमार (kanhaiya kumar) तसेच गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी (Jignesh Mevani) हे दोन्ही नेते काँग्रेसमध्ये सामील करुन घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) गुप्त बैठका सुरु आहेत.

मोठी बातमी  ! कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ? राहुल गांधीसोबत गुप्त बैठका सुरु
KANHAIYA KUMAR
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 8:38 PM

नवी दिल्ली : आगामी अनेक राज्यांत होणाऱ्या विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय राजकारण आणि काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. पक्षाची पूनर्बांधणी म्हणून काँग्रेस तरुणांना संधी देण्याच्या तयारीत आहे. तरुण आणि तडफदार नेत्यांचा शोध घेऊन काँग्रेस कात टाकण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जेएनयू आंदोलनामुळे देशभर चर्चेत आलेले कन्हैया कुमार (kanhaiya kumar) तसेच गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी (Jignesh Mevani) हे दोन्ही नेते काँग्रेसमध्ये सामील करुन घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) गुप्त बैठका सुरु आहेत. लकरच कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (cpi and student leader kanhaiya kumar and gujarat leader jignesh mevani likely to join congress soon have meeting with rahul gandhi)

राहुल गांधी यांच्या कन्हैया, मेवाणी यांच्यासोबत गुप्त बैठका

मिळालेल्या माहितीनुसार कम्युनिस्ट पक्षाचे नेते कन्हैया कुमार यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. ही बैठक शक्य तितकी गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच काँग्रेसमधील बड्या नेत्यांनादेखील या भेटीची कल्पना नव्हती. खुद्द काँग्रेसचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष भक्त चरण दास यांनादेखील कन्हैया कुमार आणि राहुल गांधी यांच्यात झालेल्या भेटीची खबर नव्हती. तर दुसरीकडे गुजरातमध्ये आमदार जिग्नेश मेवानी यांच्या रुपात काँग्रेसला तरुण आणि तडफदार चेहरा मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जातोय. काही दिवसांपूर्वी मेवाणी यांनीही राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. या भेटीत काँग्रेस प्रेवशाबाबत चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

कन्हैया यांच्या प्रवेशानंतर बिहारमध्ये काँग्रेसची शक्ती वाढणार ?

अनेक राज्यांत केंद्रीय तसेच राज्य पातळीवर काँग्रेस खिळखिळी झाली आहे. बिहारसारख्या राज्यात काँग्रेसचे फक्त 19 आमदार आहेत. येथे आरजेडीसारख्या इतर प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पक्ष मजूबत करण्याकडे लक्ष दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कन्हैयासारख्या तरुण नेत्याला पक्षात सामील करुन घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कन्हैया कुमार तरुण आणि तडफदार आहेत. तसेच तरुण, विद्यार्थ्यांमध्ये ते चांगलेच लोकप्रिय आहेत. त्यांची भाषणं, मांडलेले मुद्दे चर्चेचा विषय ठरतात. त्यामुळे कन्हैया यांचा काँग्रेसला मोठा फायदा होऊ शकतो, असा अदांज काँग्रेसमधील नेते बांधत आहेत. दरम्यान, कन्हैया कुमारने कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या पक्षातर्फे 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. भाजप नेते गिरिराज सिंह यांनी त्यांना पराभूरत केलं होतं.

मेवाणींच्या काँग्रेस प्रवेशामुळे काय फायदा होणार ?

गुजरातमध्येही काँग्रेसची फारशी चांगली स्थिती नाही. गांधी घराण्याशी जवळचा संबंध असणारे अहमद पटेल यांचे निधन झाले आहे. त्यामुळे गुजरातचे राजकारण आणि केंद्रीय नेते यांच्यातील संपर्कदुवा कोण होणार याबाबत अनेक प्रश्नचिन्ह आहेत. तर दुसरीकडे पहिल्यांदाच निवडणूक लढवून आमदार होण्याची किमया जिग्नेश मेवाणी यांनी साधलेली आहे.  दलित तसेच दुबळ्यांचे प्रश्न मांडणारा तरुण नेता म्हणून जिग्नेश यांची ओळख आहे. गुजरातमध्ये जिग्नेश चांगलेच लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे गुजरातमध्ये काँग्रेसला चांगले दिवस येण्याची अपेक्षा आहे. कदाचित याच कारणामुळे राहुल आणि जिग्नेश यांच्यात बैठक होत असावी.

दरम्यान, सध्या फक्त राहुल आणि कन्हैया कुमार तसेच जिग्नेश मेवाणी यांच्यात गुप्त बैठका होत असल्याची चर्चा आहे. खरंच दोन्ही तरुण नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का ? याबाबतचे चित्र स्पष्ट झालेले नाही. आगामी काळच या सर्व गोष्टींचे उत्तर देईल.

इतर बातम्या :

राहुल गांधींनी राऊतांना विचारलं, एका वाक्यात शिवसेना काय ते सांगा? आणि राऊतांनी थेट उत्तर दिलं

चंद्रकांत पाटील म्हणाले माजी मंत्री म्हणू नका, राऊत म्हणाले मी थेट त्यांना फोनच केला, पण नेमकं काय उत्तर दिलं?

गुजरातमध्ये मुख्यमंत्री पटेल पण दबदबा ओबीसी मंत्र्यांचा? वाचा पटेल मंत्रीमंडळाचं जातीनिहाय समीकरण

(cpi and student leader kanhaiya kumar and gujarat leader jignesh mevani likely to join congress soon have meeting with rahul gandhi)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.