विराट कोहली व्यवसायात, पुणे-मुंबईनंतर आखणी एका शहरात सुरु केले…

cricketer Virat Kohli’s One8 Commune restaurant | विराट कोहली क्रिकेटचा धडाकेबाज फलंदाज आहे. आपल्या फलंदाजीने क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे तो फेडतो. आता खवय्यांच्या चिभेचे चोचले तो पुरवणार आहे. रेस्टॉरंटच्या उद्योगात विराट आला आहे. त्याची खूप चर्चा होत आहे.

विराट कोहली व्यवसायात, पुणे-मुंबईनंतर आखणी एका शहरात सुरु केले...
टीम इंडियाचा विराट कोहली या दौऱ्यातील पहिल्या 2 मालिकांमध्ये अर्थात टी 20 आणि वनडे सीरिजमध्ये खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. रिपोर्ट्सनुसार, विराटने वर्ल्ड कपनंतर विश्रांती हवी असल्याचं सांगितलंय.
Follow us
| Updated on: Dec 12, 2023 | 9:04 AM

बंगळूर | 12 डिसेंबर 2023 : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली खेळपट्टीवर चांगल्या चांगल्या गोलंदाजांचा घाम काढतो. आपल्या फटकेबाजीने तो क्रिकेटप्रेमींना आनंद देतो. विराट कोहली यांनी सध्या व्हाईट बॉल क्रिकेटमधून ब्रेकही घेतला आहे. विराट आपला व्यवसाय हळहळू वाढवत आहे. आपल्या फलंदाजीने प्रेक्षकांना खूश करणारा विराट आता खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवणार आहे. विराट कोहली रेस्टॉरंट व्यवसायात उतरला आहे. विराट कोहली याने पुणे, मुंबईत, गुरुग्राम आणि कोलकोत्ता येथे रेस्टॉरंट सुरु केले आहे. One8 Commune नावाचे रेस्टॉरंटची साखळी देशभरात सुरु करणार आहे. आता बंगळूरमध्ये त्याने हे रेस्टॉरंट सुरु केले आहे.

बंगळूरमधील रेस्टॉरंट…कप्लससाठी विशेष काही

बंगळूर येथे सुरु केलेले रेस्टॉरंट तीन मजली आहे. त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या डायनिंग सुविधा दिल्या आहेत. या ठिकाणी कप्लससाठी विशेष सुविधा दिली आहे. रोमांटिक ईवनिंगपासून ग्रुप सेलिब्रेशनपर्यंत सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. परिवारासाठी या ठिकाणी अधिक चांगली सुविधा तयार केली आहे. विराट कोहली याच्या या रेस्टॉरंटची खूप चर्चा होत आहे. रेस्टॉरंटमध्ये क्रिकेट प्रेमी, खवय्यांबरोबर सर्वसामान्य लोकही येत आहेत.

virat kohli restaurant

लोकांना सेल्फीसाठी…

विराट कोहली याचे रेस्टॉरंट चांगले सजवण्यात आले आहे. त्यात विराटचे साइन लावले गेले आहे. याठिकाणी अनेक जण सेल्फी घेत आहेत. सोशल मीडियावर विराट कोहलीच्या रेस्टॉरंटचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामुळे विराट कोहलीच्या रेस्टॉरंटसंदर्भात लोकांची आवड आणि उत्सुक्ता दिसून येत आहे. बंगळूरमध्ये गर्दीमुळे लोकांना परत जावे लागल्याचे प्रकार घडले आहेत.

हे सुद्धा वाचा

शनिवार, रविवारी मोठी गर्दी

विराट कोहली याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात व्हाईट बॉलमधून ब्रेक घेतला आहे. तो आयपीएलमध्ये बंगळूर चॅलेंजर्सच्या टीमसोबत आहे. यामुळे बंगळूर शहरात त्याचे मोठ्या संख्येने फॅन आहेत. शनिवार आणि रविवारी रेस्टॉरंटमध्ये चांगली गर्दी होत आहे. विराट कोहली याच्या लाइफस्टाईलने प्रभावित होऊन अनेक जण रेस्टॉरंटमध्ये येत आहेत.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.