Ram Mandir: 31 वर्षांनंतर CRPF ला राममंदिरातून हटवलं, आता यांच्याकडे सुरक्षेची जबाबदारी
Ram Mandir Update : 1993 साली बाबरी पाडल्यानंतर या ठिकाणी ३१ वर्षांपासून सीआरपीएफ तैनात करण्यात आली होती. आता या ठिकाणी राम मंदिराचे काम पूर्ण होत असून या मंदिराची जबाबदारी आता कोणाकडे देण्यात आली आहे वाचा.
Ram mandir : राममंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेची तयारी जोरात सुरू आहे. राम मंदिराबाबत संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण आहे. राम मंदिर पाहण्यासाठी अनेक जण उत्सूक आहेत. त्यातच राम मंदिराच्या सुरक्षेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. राम मंदिराची सुरक्षा करणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाला (CRPF) आता येथून हटवण्यात आले आहे. राम मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी आता यूपी पोलिसांच्या खांद्यावर आली आहे. यूपी पोलिसांचे विशेष पथक राम मंदिर परिसराची सुरक्षा व्यवस्था हाताळेल.
1992 मध्ये सीआरपीएफ तैनात
1992 मध्ये बाबरी पाडल्यापासून येथे सीआरपीएफ तैनात करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफला देण्यात आली होती. मात्र आता राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार असल्याने यूपी पोलिसांचे विशेष सुरक्षा पथक (एसएसएफ) तैनात करण्यात येणार आहे. राम मंदिराच्या सुरक्षेसाठी यूपी पोलिसांच्या विशेष दलाला आधीच प्रशिक्षण देण्यात आले आहे.
स्पेशल टास्क फोर्सकडे जबाबदारी
अयोध्या राम मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी आता स्पेशल टास्क फोर्स (STF) कडून घेतली जाणार आहे. राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने सर्वांनाच उत्सुकता आहे. जगभरातील लोकांना याचा आनंद आहे. 22 जानेवारीला पुन्हा एकदा दिवाळी साजरी करण्यासाठी लोकं उत्सुक आहेत.
नेपाळमधून येणार पाहुणे
अयोध्या शहरात जोरात तयारी सुरू आहे. नेपाळमधील भगवान श्री राम यांच्या सासरच्या घरातून 25 लोकांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. हे विशेष लोकं प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहतील.
2 लाख लाडूंची पाकिटे
मेहंदीपूर बालाजीहून अयोध्येला लाडूंची दोन लाख पाकिटे पाठवली जाणार आहेत. याशिवाय १ लाख दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे.