2022 मधील पहिलं चक्रीवादळ Asani बंगालच्या उपसागरात तयार होणार? आर्मीसह यंत्रणा अलर्टवर

भारतीय हवामान विभागानं आज बंगालच्या उपसागराच्या दक्षिण पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल आणि चक्रीवादळ निर्माण होऊ शकते, असा अंदाज वर्तवला आहे.

2022 मधील पहिलं चक्रीवादळ Asani बंगालच्या उपसागरात तयार होणार? आर्मीसह यंत्रणा अलर्टवर
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 10:05 PM

नवी दिल्ली: बंगालच्या उपसागरामध्ये (Bay of Bengal) येत्या 21 मार्चच्या दरम्यान Asani चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालं आहे. केंद्रीय गृहसचिवांनी केंद्रीय मंत्रालय आणि विविध यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या तयारीचा आढावा घेतला. अंदमान आणि निकोबारच्या (Andaman Nikobar) प्रशासनासोबत देखील बैठक घेण्यात आली आहे. तर, 21 मार्चच्या दरम्यान अंदमान आणि निकोबारमध्ये वेगवान वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं आज बंगालच्या उपसागराच्या दक्षिण पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल आणि चक्रीवादळ निर्माण होऊ शकते, असा अंदाज वर्तवला आहे.

पर्यटनावर बंदी

केंद्रीय गृहमंत्रालयानं अधिकृत नोटिफिकेशन काढून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक म्हणजेच एनडीआरएफला पोर्ट ब्लेअरला तैनात करण्याचे आदेश दिले आहे. अंदमान निकोबार येथील नागरिकांचं संरक्षण, पायाभूत सुविधांचं पुनर्निमाण करण्याची जबाबदारी एनडीआरएफवर आहे. अंदमान निकोकबारमधील मासेमारी, पर्यटन आणि जहाज वाहतूक बंद करण्यात आली आहे. इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, एअर फोर्स आणि इंडियन कोस्ट गार्डला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वर्षातील पहिलं चक्रीवादळ येणार?

केंद्रीय गृहसचिवांनी केंद्रीय मंत्रालयांना बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर, अंदमान आणि निकोबारमधील प्रशासनाच्या संपर्कात राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यंदाचं हे पहिलं चक्रीवादळ 21 मार्च रोजी येण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

आयएमडीनं केलेल्या ट्विटच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरावरील बदलत्या वातावरणीय स्थितीमुळं चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. 20 मार्चपर्यंत कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होऊन 21 मार्चला चक्रीवादळ निर्माण होऊ सकतं. त्यानंतर ते बांग्लादेश, म्यानमारपर्यंत 22 मार्चला पोहोचेल. तर, आयएमडीच्या माहितीनुसार या चक्रीवादळाचा फटका भारतीय भूमीला कमी प्रमाणात बसू शकतो. मात्र, अंदमान निकोबारमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो.

इतर बातम्या :

Virar | Holi साठी वर्गणी मागायला गेले, घरात मृतदेह पाहून हादरले! पत्नीची हत्या करुन पती फरार!

कोरोनाचा संसर्ग आणि व्हायरसला रोखण्यासाठी गायीचं दूध अत्यंत उपयुक्त! नव्या संशोधनानं चकीत करणारी माहिती समोर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.